Monday, February 10, 2025
Homeअकोला जिल्हाअकोलेकर सुखावले ! 'पारा' उतरला: विदर्भात 10 जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’

अकोलेकर सुखावले ! ‘पारा’ उतरला: विदर्भात 10 जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला जिल्ह्यसह अकोला तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असताना, अकोला शहर व आसपासच्या परिसरात पावसाने पाठ फिरवली होती. प्रचंड उकाड्याने अकोलेकर हैराण झाले होते. आतुरतेने पावसाची वाट पाहत असताना आज रविवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरुवात झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. काही वेळाने पावसाने विश्रांती घेत दुपारी 3.30 वाजतापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस संततधार सुरू आहे. यामुळे तापमानात घट झाली असून अकोला शहरात जवळपास 4 होऊनही पाऊस संततधार सुरू आहे आणि वातावरणात गारवा निर्माण झाल्याने अकोलेकर सुखावले !

गेल्या दिवसांपासून लपंडाव करणारा पाऊस आज मात्र कोसळत आहे. हा पाऊस सर्वत्र सुरू आहे. मोसमी पावसाने संपूर्ण विदर्भ व्यापला असला तरीही पावसाने मात्र विदर्भाकडे पाठ फिरवली होती. पश्चिम विदर्भात थोडाफार पाऊस झाला पण अकोला शहरात पावसाने दडी मारली होती. अवकाळी पावसाने मात्र तांडव घातले होते. जूनच्या अखेरपर्यंत पाठ फिरवणारा पाऊस जुलै पासून हलक्या स्वरूपात कोसळत आहे. समुद्रसपाटीवरील दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टी लगत असलेल्या कमी दाबाचा पट्टा आज कायम आहे. आज रविवार सात जुलै पासून पुढील पाच दिवस कोकण व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून येत्या दहा जुलै पर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ‘येलो अलर्ट’ तर काही जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भासह कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

विदर्भात आठ ते दहा जुलैदरम्यान काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना 10 जुलैपर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर पुणे, कोल्हापूर,सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,  उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात दहा जुलैला काही ठिकाणी तर सात ते नऊ जुलै दरम्यान बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!