Saturday, November 9, 2024
Homeसामाजिक20 जुलैला पत्रकारिता पुरस्कार वितरण व गुणवंत पाल्यांचा सत्कार

20 जुलैला पत्रकारिता पुरस्कार वितरण व गुणवंत पाल्यांचा सत्कार


अकोला दिव्य ऑनलाईन : मराठी पत्रकार परिषद मुबंईसंलग्न अकोला जिल्हा पत्रकार संघाचे वतीने येत्या 20 जुलैला उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक पत्रकार भवनातील स्व. पन्नालाल शर्मा सांस्कृतिक सभागृहात सकाळी 10 वाजता आयोजित सोहळ्याला नवनिर्वाचित खा. अनुप धोत्रे तसेच आ. रणधीर सावरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहेत. अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा असणार आहेत.
अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने अकोला जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व वृत्तपत्र क्षेत्रातील दिवंगत माजी खासदार नानासाहेब वैराळे, स्व.कमलकिशोरजी बियाणी, स्व.शांताराम सरदेशपांडे, स्व.रामेश्वरलाल अग्रवाल, माजी खासदार मो. असगर हुसेन, स्व.जमनलाल गोयनका, स्व.आबाराव देशमुख, स्व. आप्पासाहेब वैराळे, स्व. दिनेश कक्कड या 9 दिवंगत मान्यवरांच्या स्मृतीत दर दोन वर्षांनी अकोला जिल्ह्यातील 9 पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच दरवर्षी अकोला जिल्ह्यातील पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात येतो.

या संयुक्त सोहळ्याला पत्रकारांच्या नोंदणी झालेल्या सर्व गुणवंत पाल्यांनी, पालकांनी, सत्कारमूर्ती पत्रकार बंधू भगिनींनी, ज्यांच्या नावाने पत्रकारांना पुरस्कार देण्यात येतात त्या दिवंगत मान्यवरांच्या वारसांनी व माध्यम बंधूभगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिर साहेब, जिल्हा सरचिटणीस प्रमोद लाजूरकर, उपाध्यक्ष गजानन सोमाणी, जिल्हा चिटणीस विजय शिंदे, रामदास वानखडे, अविनाश राऊत, गजानन राऊत, तालुका अध्यक्ष दिलीप देशमुख, सतीश सरोदे, फैय्यम देशमुख, प्रल्हाद ढोकणे, किशोर लोणकर, जिल्हा कार्यालयीन चिटणीस कमल शर्मा, दिलीप दांदळे, प्रसिद्धी प्रमुख विलास खंडारे, समाधान खरात आदींनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!