Saturday, November 9, 2024
Homeसामाजिकछायाचित्रकारांना अपघाती विमा ! अकोला-बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचा वर्धापन दिन

छायाचित्रकारांना अपघाती विमा ! अकोला-बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचा वर्धापन दिन

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला जिल्ह्यातील छायाचित्रकारना भारतीय डाक विभागाच्या अपघाती विम्याचे कवच प्रदान करण्यात आले. अकोला बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे 31 व्या वर्धापन दिननिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.‌एल आर टी महाविद्यालया लगत असलेल्या फोटोग्राफर असोसिएशनच्या कार्यालयात असोसिएशनचा वर्धापन दिनानिमित्त मोठा उत्साह साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम असोसिएशनच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या जेवढे सदस्य तेवढे वृक्ष लावण्याचा संकल्प यावर्षीही राबवण्यात आला. वृक्षारोपण नंतर डाक अपघाती विमा शिबिर साकार करण्यात आले. हेड पोस्ट ऑफिस मधील पोस्ट बँकेचे व्यवस्थापक सुगत हलदर यांच्या सहकार्याने शिबिर राबविण्यात आले. आज सोमवारी झालेल्या या शिबिरामध्ये फोटोग्राफर असोसिएशनच्या जवळपास 80 सदस्यांनी अर्ज भरून विमा काढून घेतला. हा उपक्रम टप्प्याटप्प्याने सर्व सदस्यांना लाभ देण्यासाठी सातत्याने सुरू राहणार असल्याचे अकोला बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र नायसे यांनी सांगितले. शिबिरामध्ये असोसिएशनचे उपाध्यक्ष नीरज भांगे, दिग्विजय देशमुख, सचिव नितीन देशमुख, सहसचिव उमेश चाळसे, कोषाध्यक्ष योगेश उन्होंने, सदस्य हर्षल गडेकर, महेश इंगळे तसेच प्रवीण अम्बिलकर, राज पिंपळे, दीपक हिवरकर, गणेश खेते, अरविंद इंगळे मोहन पाटील, विनोद तगारेसह सर्व सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!