Friday, December 13, 2024
Homeसामाजिकई पॉज मशीन ! धान्याचे वितरण ठप्प ; स्वस्त धान्य दुकानदार व...

ई पॉज मशीन ! धान्याचे वितरण ठप्प ; स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन संघटनेची मागणी

अकोला दिव्य ऑनलाईन : शासनाने २ महिन्यापूर्वी नवीन ई-पाॅज मशीन उपलब्ध करून दिल्यात. परंतु एक महिन्यानंतर मशीनमध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्या. परिणामी गत पंधरा दिवसापासून मशीन बंद असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील 30 ते 40 टक्के धान्य वाटप रखडले असून, दुकानदार व कार्डधारकांमध्ये खटके उडत आहेत. कंपनीने नेमून दिलेल्या प्रतिनिधीकडे वारंवार तक्रार करून सुद्धा मशीन चालू होत नाही. त्यामुळे अकोला जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देऊन ई-पाॅज मशीन तातडीने दुरुस्त करुन द्यावी आणि जुलै महिन्यातील उर्वरित धान्य वाटप ऑगस्ट महिन्यात 30 तारखेपर्यंत वाढवून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.


शासन स्तरावर कार्य सुरू असून लवकरच मशीन चालू होईल,असे आश्वासन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश शर्मा, महानगर अध्यक्ष योगेश अग्रवाल, जिल्हा सचिव मो.आरिफ, शरद तुरकर, दिवाकर पाटील,आकाश वानखडे, शुभम गुप्ता, संजय थावरानी, गजानन घुले, राहुल रुंगटा, सुंदर लुल्ला, राजू ठाकूर, रवी माने, मो.शोएब, पंकजा अवस्थी, रविकांत भिरड, शेख फरहान, पंकज शुक्ला, दिनेश शर्मा, शेख जावेद, अशोक शुक्ला, दाऊदभाई आणि मोठ्या संख्येने दुकानदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!