Friday, September 20, 2024
Homeताज्या घडामोडीलक्षात ठेवा ! अकोला मार्गे धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या रद्द : राजनांदगांव-कळमना...

लक्षात ठेवा ! अकोला मार्गे धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या रद्द : राजनांदगांव-कळमना मार्गावर तिसऱ्या रेल्वे लाइनची जोडणी

अकोला दिव्य ऑनलाईन : नागपूर विभागातील राजनांदगांव ते कळमना मार्गावर तिसऱ्या रेल्वे लाइनच्या जोडणीचे काम सुरू असल्याने अकोला मार्गे धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची यादरम्यान कोंडी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी तातडीने दखल घेऊन नियोजनात बदल करावा असे आवाहन केले जात आहे. रेल्वे ट्रॅकच्या देखभालीमुळे १९ ऑगस्ट रोजी ७३ पेक्षाजास्त गाड्या रद्द करण्यात येत आहेत. त्याचबरोबर ५ गाड्यांना मार्गात थांबवण्याचा निर्णय घेतल जात आहे. सोबतचं २२ गाड्यांना बदललेल्या मागार्ने सोडल्या जाणार आहेत. या तांत्रीक कामामुळे अकोला मार्गावरील ३० गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित झाले आहे.आहे.

राजनांदगाव -कळमना विभागात इंटरलॉकिंगचे काम

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे विभागात राजनांदगांव-कळमना रेल्वे मार्गावर तिसरी रेल्वे लाइन जोडण्याचे महत्वाचे काम सुरू होणार आहे. या कामामुळे काही दिवसांसाठी रेल्वे वाहतूक प्रभावित होणार आहे. प्री-नॉन इंटरलॉकिंगचे काम ४ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट २०२४ रोजी तर नॉन इंटरलॉकिंगचे काम १४ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२४ रोजी केले जाणार आहे. त्यामुळे खालील गाड्या दिलेल्या तारखेला रद्द करण्यात आल्या आहेत.

संग्रहित छायाचित्र

१२८३४ हावड़ा-अहमदाबाद एक्सप्रेस १०, ११ ऑगस्ट रोजी रद्द, १२८३३ अहमदाबाद-हावड़ा एक्सप्रेस १३, १४ ऑगस्टरोजी रद्द, १२८६० हावड़ा-मुंबई गीतांजली एक्स ७,११,१२ ऑगस्टला रद्द, १२८५९ मुंबई-हावड़ा गीतांजली एक्स ७,९,१३,१४ ऑगस्टला रद्द, १८०३० शालीमार-एलटीटी एक्सप्रेस ११ ते १७ ऑगस्टला रद्द, १८०२९ एलटीटी-शालीमार एक्सप्रेस १३ ते १९ ऑगस्ट रोजी रद्द, २२८४६ हटिया-पुणे एक्सप्रेस ५, ९ ऑगस्ट २०२४ रोजी रद्द, २२८४५ पुणे- हटिया एक्सप्रेस ७, ११ ऑगस्ट २०२४रोजी रद्द, १२८८० भुवनेश्वर-एलटीटी एक्सप्रेस ०८, १५ ऑगस्ट रोजी रद्द, १२८७९ एलटीटी-भुवनेश्वर एक्सप्रेस १०, १७ ऑगस्ट रोजी रद्द, १२८१२ हटिया-एलटीटी एक्सप्रेस १६ ऑगस्ट २०२४ रोजी रद्द, १२८११ एलटीटी-हटिया एक्सप्रेस १८ ऑगस्ट २०२४ रोजी रद्द, १२२२२ हावड़ा-पुणे दुरंतो एक्सप्रेस १५ ऑगस्ट २०२४ रोजी रद्द, १२२२१ पुणे-हावड़ा दुरंतो एक्सप्रेस १७ ऑगस्ट २०२४ रोजी रद्द, २०८५७ पूरी-साईनगर शिरडी एक्सप्रेस ९, १६ ऑगस्टला रद्द, २०८५८ साईनगर शिरडी-पूरी एक्सप्रेस ११, १८ ऑगस्टला रद्द, १२९९३ गांधीधाम-पूरी एक्सप्रेस १६ ऑगस्ट रोजी रद्द,

१२९९४ पूरी-गांधीधाम एक्सप्रेस १९ ऑगस्ट २०२४ रोजी रद्द आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!