अकोला दिव्य ऑनलाईन : प्रत्येक क्षेत्रात काळानुरूप बदल होत असतात आणि होत असलेल्या बदलांचा अंगीकार केला पाहिजे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सनदी लेखापालांनी लक्ष ठेवून रहावे, अलिकडे आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा उपयोग करावा, असे आवाहन वेस्टन इंडिया रिजनल काऊन्सिलचे माजी अध्यक्ष सीए अर्पित काबरा यांनी केले.
दि.इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउन्टन्स ऑफ इंडिया, अकोला शाखेतर्फे स्थानिक आय.सी.ए.आय.भवन येथे ‘सनदी लेखापालांनी ‘आर्टिफिशल इन्टेलिजन्सी’ चा उपयोग तथा ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ बनविताना घ्यावयाची काळजी या विषयांवर आयोजित चर्चासत्र ते बोलत होते. दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करुन विधीवत उद्घाटन करण्यात आले.
अकोला शाखाध्यक्ष सीए सुमित आलिमचंदानी यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, सनदी लेखापालांनी विविध चर्चासत्रात सहभागी होऊन तज्ज्ञ वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन आत्मसात करून आपल्या व्यवसायात त्याचा उपयोग करावा.
प्रमुख वक्ता सीए काबरा यांनी ‘अनलॉक व्हॅल्यू ऑफ एआय इन फिल्ड ऑफ सीए’ या विषयावर तसेच वक्ते सीए शिव भगवान आसावा यांनी ‘डिफरन्स डायमेशन टू प्रॉक्टीस अँड मास्टरिंग प्रोजेक्ट फायनाशियल’ या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करून उपस्थितांचा शंकांचे निराकरण केले. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी कार्यकारीणी सदस्यांनी परिश्रम केले.अशी माहिती जनसंपर्क समितीचे अध्यक्ष सीए रमेश चौधरी यांनी दिली.