Saturday, September 21, 2024
Homeताज्या बातम्यामृत्यू ही ओशाळला ! एकाही घरात चूल पेटली नाही; वरणगाव शोकसागरात"

मृत्यू ही ओशाळला ! एकाही घरात चूल पेटली नाही; वरणगाव शोकसागरात”

अकोला दिव्य ऑनलाईन : नेपाळमधील गण्डकी प्रांतातील तनहुँ जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत भाविकांची बस कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत 5 गावातील तब्बल 25 भाविकांचे निधनाने झाले. विशेष विमान या भाविकांचे मृतदेह घेऊन रात्री सव्वासात वाजेच्या सुमारास विशेष विमान जळगावात दाखल झाले. तब्बल दोन तासांच्या तपासणीनंतर २५ शववाहिकांमधून मृतदेह वरणगावसह सुसरी, पिंपळगाव खुर्द, गोळेगाव, तळवेल, आचेगाव या गावात आल्यावर इथे ओशाळला मृत्यू ! पंचक्रोशीत टाहो, आक्रोश आणि हुंदकेच हुंदके फुटत असताना गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रुंचा पुर वाहत होता. सगळं गावं जणू स्मशान झाले. तेव्हा इथे मृत्यू ही ओशाळला !

भाविकांच्या बसला झालेल्या अपघातानंतर मृतांचे मृतदेह जळगावात आणण्यासाठी शनिवारी दिवसभर हालचाली सुरू होत्या. आंतरराष्ट्रीय सेवेचे विमान जळगावात उतरवता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, काठमांडूत भारतीय संरक्षण खात्याचे विमान उतरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट संपर्क साधला. त्यानुसार काठमांडूहून मृतदेह घेऊन निघणाऱ्या गृह मंत्रालयाच्या विमानाला जळगावात उतरविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. अमित शाह यांनी तातडीने त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर काठमांडूवरुन संरक्षण दलाचे विशेष विमान थेट मृतदेहांना घेऊन रात्री सव्वासात वाजता जळगाव विमानतळावर दाखल झाले. यादरम्यान चौकशी व पडताळणी करून तब्बल दोन तासांनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

चैतन्यमय वातावरणात ज्यांना देवदर्शनासाठी निरोप दिला. त्यांना अवघ्या ७ दिवसात शेवटचा निरोप देण्याची दुर्देवी वेळ आल्याने गावकऱ्यांचे अश्रू अनावर झाले. उगीच आव आणत एकमेकांची समजूत काढली जाऊ लागली. तर अबोला असलेले देखील हादरुन गेले होते. काळजात धडधड वाढली होती. गावातील एकाही घरात चुल पेटवली गेली नाही.गावातच स्मशान शांतता पसरली होती.

या अपघातात वरणगाव येथील दोन कुटुंबातील चार- चार जणांचा मृत्यू झाला.तर गावातील एका मुलीसह दहा भाविकांचे मृतदेह बघून संपूर्ण गाव सुन्न झाले. वरणगावमधील जावळे वाड्यात राहणारे सुधाकर जावळे यांच्यासह त्यांच्या परिवारातील चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला. तर गणेश नगरातील संदीप भारंबे यांच्या कुटुंबातीलही चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला. या दोन भागात अवघ्या वरणगावातील नागरिक एकवटले होते. सुधाकर जावळे हे माजी नगरसेवक होते तर संदीप भारंबे हे देखील गावातील अनेक धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर राहायचे. त्यामुळे त्यांचा गोतावळा मोठा होता. तळवेल या गावातील पाच कुटुंबातील ९ यात्रेकरू असल्याने सर्व गावकरी हादरले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!