Saturday, October 5, 2024
Homeसांस्कृतिकअकोल्यात श्री मारवाडी प्रेस....अद्वितीय 'सूर-संगीत' समर्पित 'गणेशाराधना'

अकोल्यात श्री मारवाडी प्रेस….अद्वितीय ‘सूर-संगीत’ समर्पित ‘गणेशाराधना’

अकोला दिव्य ऑनलाईन : देवाधी देव महादेव यांचे पुत्र आणि आद्य पुजेचा मान असलेले श्रीगणेश यांच्या विषयक श्रीगणेशपुराण आणि श्रीमुद्गलपुराण या प्राचीन ग्रंथानुसार श्रीगणेश हा चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. श्रीगणेशाच्या चौसष्ट कलांमध्ये गायन व संगीत कलांचा समावेश असून श्री गणेशा हा प्रत्येक क्षेत्रातील कला उपासकांना आराध्य असल्या कारणाने यंदा श्री मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाने जुन्या काळातील प्रख्यात गायक आणि संगीतकार यांचे छायाचित्र आणि त्यांच्या गाण्याच्या इन्स्ट्रूमेंट धून असा संयुक्तिक अप्रतिम देखावा सादर केला आहे.

अत्यंत कल्पकता वापरून, आगळ्यावेगळ्या पद्धतीने चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेशाची आराधना करताना सिद्धिविनायक गणेशाची अत्यंत विलोभनीय अशी रिद्धी-सिद्धी सोबतची भव्य प्रतिमा विराजमान करण्यात आली आहे. नृत्य कलावंताचे आराध्य दैवत असलेले, नर्तक स्वरूपातील नटराज आणि विद्या वासिनी मॉं शारदा यांच्या प्रतिमेच्या सोबतीने महान संगीतकार, गायक, गायिका यांच्या छायाचित्रांतून साकारलेली झांकी आणि पारंपारिक वाद्याची प्रतिकृतीसह कला क्षेत्राशी संबंधित अनेक भव्य दिव्य झाक्यांनी शास्त्रीय कलेवर आधारित होणारी गणेशाराधना रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे.

नेहमी प्रमाणे मूर्तिकार सुरेश अंबेरे यांनी गणेशाची अप्रतिम मुर्ती साकारली असून मुहूर्तावर पंडित सचिन शर्मासह ११ ब्रम्हवृंदाच्या विधिवत मंत्रोच्चारात डॉ संतोष सोमाणी यांनी सपत्नीक पूजा अर्चना करीत मुर्तीची स्थापना केली. बाबू बागडे यांनी केलेली मंडप सजावट आणि गाडगेबाबा सर्विसेस यांच्या विद्युत आरास व अचूक ध्वनी व्यवस्थेने प्रसन्नचित्त वातावरण निर्माण झाले आहे.
रागिनी संगीत विद्यालयाचे संचालक सतिश खोडवे दररोज रात्री ९ वाजता संगीतमय आरतीचे गायन आणि दररोज सकाळी ८ वाजता मंडळाचे सदस्य आरती करणार आहेत.

संपूर्ण १० दिवस दररोज सकाळी ११:३० वाजता जिल्हा स्त्री रुग्णालय (लेडी हार्डिंग्ज) येथे भोजन वाटप तसेच या दरम्यान सामुदायिक सुंदरकांड पठण, संयुक्त गोसेवा, सामुहिक गणपती अथर्वशीर्ष पठण तसेच रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी आणि निःशुल्क मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिर, इयत्ता ८ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मार्गदर्शन यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत.
‘सूर-संगीत’ समर्पित ‘गणेशाराधना’ उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अध्यक्ष गोविन्द लढ्ढा सचिव अजय सारडा, उपाध्यक्ष प्रशांत चांडक, अमित भूतडा, अंकेक्षक राम बाणाईत, कोषाध्यक्ष विलास मोरे तसेच सल्लागार अनिल तापडिया, शरद चांडक, ब्रजेश तापडिया, शैलेन्द्र तिवारी, पंकज तापडिया, नितिन चांडक, आशीष राठी, सचिन चांडक, भूपेंद्र तिवारी, केशव खटोड, सुशांत राठी, मनोज लढ्ढा, आर्किटेक्ट अमित राठी, कार्यकारिणी सदस्य कमलकिशोर तापडिया, जगमोहन तापडिया, मनमोहन तापडिया, विश्वनाथ शर्मा, लूणकरण मालाणी, नरेंद्र भाला, सुनील बंग, गोपाल लाहोटी, नंदकिशोर बाहेती, राधेश्याम चांडक, डॉ. संतोष सोमाणी, प्रमोद कचोलिया, विजय राठी (जावरा), राम लढ्ढा पराग शाह, शैलेश शाह, उदय शाह, अतुल मांडाणी, दिवेश शाह, कल्पेश शाह, प्रशांत शाह, सत्यम अग्रवाल, संजय मंत्री, प्रमोद मालपाणी, अनंत बोदड़े, आश्विन जाजू, अलोक भूतडा, कुणाल चांडक, राज शर्मा, नितिन जाजू, सुमित कोठारी, अनुराग कोठारी, जतिन राठी, अजय सारडा, प्रतिक भूतडा, पलक तिवारी, लोकेश टावरी, हितेश मुंधडा, निशांत भंसाली, हिमांशु मानधणे, लक्ष्य राठी, अद्वैत तापडिया, संकेत चांडक, सुजल चांडक, गौरव चांडक, ध्रुव राठी, आकाश बोदडे, विलास मोरे, प्रभु मोरे, सुहास पाटिल, विठ्ठल महल्ले, अक्षय मोरे, राजू तायडे, दिलीप बोदडे, राजेश खेडकर, संदीप भैय्या, आकाश जैन, डॉ रुपेश शाह, भरत तापडिया, योगेश कलंत्री, गोपाल राठी, मधु भट्टड, विजय मानधणे, नीरज तापडिया, मुन्ना दुबे, गौरव रांदड, नारायण दुबे, राकेश दुबे, नकुल सोनी आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!