अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला ते वाशिम राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने धावत असलेल्या चारचाकी वाहनासमोर अचानक बिबट्या आल्याने जोरदार धडकेने घडलेल्या अपघातात घटनास्थळीच बिबट्याचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच जवळच्या गावातील लोकांनी एकच गर्दी केली होती. मेडशी परिसरातील जंगलातुन बिबट्या बाहेर आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अकोला वाशिम महामार्गावरील भंडारज ते नांदखेडा फाटा दरम्यान ही घटना घडली असून माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. यासोबतच पोलिसांना सूचना दिली आहे. घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने अज्ञात वाहनाचा शोध घेणे अवघड आहे. वृत्त लिहिस्तोवर पंचनामा सुरू होता.
सविस्तर बातमी लवकरच