अकोला दिव्य ऑनलाईन : आता विदेशासोबतच भारतातील उद्योग समुह (कार्पोरेट वर्ल्ड) च्या व्यावसायिक (नोकरी) धोरणात झापाट्याने बदल होत आहेत. आज केवळ पदवी (डिग्री) च्याच माध्यमातून नोकरी मिळणे अवघड होतं आहे. विशेष म्हणजे आर्थिक क्षेत्रात (M.B.A/C.F.A इत्यादी) भविष्य घडविण्यास आता, पदवी असूनही नोकरी मिळणे प्रचंड आवड झाले आहे. कारण……. सर्वच कंपन्यांनी व्यापक दृष्टिकोन केले असून, याकडे कोणाचेच लक्ष नाही……. आता शिक्षण म्हणजे वर्षाच्या शेवटी देण्याची परीक्षा नव्हे, तर शिक्षणासोबतच ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्या क्षेत्रात कराव्या लागणाऱ्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव पाठीशी असणे गरजेचे झाले आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अचानक, पूर्व कल्पना नसताना कसोटी, परीक्षा, समस्या सामोरे जावे लागते. पण यामुळे घाबरून चालण नाही, तर….अशा अनेक गंभीर मुद्द्यावर विशेषतः
आर्थिक क्षेत्रात विशेषत्वाने M.B.A/C.F.A इत्यादी पदवीधारकांना फायनान्स सेक्टर मध्ये प्रत्यक्षात नेमकं काय काम करावे लागते आणि यासाठी प्रत्यक्षात अनुभव नसल्याने नेमके Interview मध्ये कसा घात होतो…….. या अनुषंगाने अत्यंत समर्पक/सडेतोड अर्थात कटू पण सत्य परिस्थिती प्रकाश झोतात आणली….
प्रशिक्षक/ समुपदेशक व संचालक शैलेश भाला यांनी दिलेली माहिती ऐकून सर्वांना गंभीरपणे विचार करण्याची गरज भासेल, हे नक्की , तर उद्या गुरुवार 26 सप्टेंबरला YouTube वर Gajanan Somani’s PodCosT मध्ये जरूर ऐका, उद्या यासाठीची लिंक आम्ही शेअर करणार असून……..फिर एक बार…….. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. तर भेटू या