अकोला दिव्य ऑनलाईन : भारत विकास परिषदेतर्फे आयोजित राष्ट्रीय समूह गीत गायन स्पर्धेत अकोला रिधोरा येथील श्री समर्थ पब्लिक स्कूलने विदर्भ प्रांतामधून प्रथम क्रमांक प्राप्त केला. संस्थेचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे व संचालिका प्रा. जयश्री बाठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विदर्भातून गीतगायन स्पर्धेत समर्थ स्कूलने मिळवलेले यश निश्चितच गौरवास्पद असल्याची भावना संस्थाध्यक्ष प्रा.नितीन बाठे यांनी व्यक्त केली.
या स्पर्धेमध्ये स्वरा रोकडे, आराध्या डांगे, हिमांशू पिंजरकर, अर्णव डोंगरे, पायल जमाव ,आराध्या राऊत, श्रेया म्हैसने, आराध्या वैराळे, शर्वरी मुरकर, आराध्या मेटांगे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. तर यासाठी शाळेचे संगीत शिक्षक हार्दिक दुबे व वंदना मिश्रा यांनी परिश्रम घेतले.
या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. राजेश बाठे, शाळेचे सहसचिव प्रा. किशोर कोरपे, सदस्य प्रा. किशोर रत्नपारखी, सदस्य प्रा.योगेश जोशी, संस्थेचे शिक्षण संचालक प्रा. डॉ. जी.सी.राव, शाळेच्या अकॅडमी संचालक सुवर्णा गुप्ता, प्राचार्य अश्विनी थानवी यांनी सर्व गायन समूहाचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.