अकोला दिव्य ऑनलाईन : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील व डॉ राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी जिल्हाध्यक्ष उमेश इंगळे, जिल्हा महासचिव महेंद्र भोजने यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष शिलवंत वानखडे यांच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूसंचाचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष सुनील शिरसाठ होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा महासचिव एम.एम तायडे, बाळासाहेब अंभोरे, यशवंत इंगोले, हिम्मतराव संदाशिव मधुकर शिरसाट, रिपाइं युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुभाष इंगोले,रिपाइं युवक आघाडी बाळापूर तालुकाध्यक्ष डॉ विजय इंगळे, सतिश इंगळे, कमाल भाई यांच्या हस्ते गृहोपयोगी वस्तूसंचाचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन कामगारांच्या हितासाठी सतत झटणारे करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शिलवंत वानखडे यांनी केले होते.