अकोला दिव्य ऑनलाईन : जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादीत केल्याने प्रभात किड्स स्कूलच्या 17 बास्केटबॉलपटूंनी विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन अकोला येथे करण्यात आले होते.
या जिल्हास्तरीय बॉस्केटबॉल स्पर्धेत 14 वर्षाआतील मुलांमध्ये अनुज खेंडकर, रवतेज मल्ही, 14 वर्षाआतील मुलींमध्ये तन्वी मेहेरे, अन्वी मोडक, 17 वर्षाआतील मुलांमध्ये वेदांत चव्हाण, केयुर वानखडे तर 17 वर्षाआतील मुलींमध्ये भक्ती पाकधने, अक्षरा टोपरे, अव्हानी जाधव, अपुर्वा मिटकरी, श्रुष्टी डाबेराव, अदिती गवई, आसावरी भटकर, आस्था ताथोड, अनुष्का खांडे, रिद्धी मानकर व आनंदी मानकर या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश प्राप्त केले. या सर्व विजयी खेळाडूंना प्रभातचे क्रीडा प्रशिक्षक आशिष बेलोकार व शितल गावंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वयक मो. आसिफ व क्रीडा विभागप्रमुख संतोष लोमटे यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले असून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.