अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला शहरातील एका परिसरातून काही वर्षांपूर्वी ‘मार्फिन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आल्या नंतर एकच खळबळ उडाली होती तर काल गुरुवारी एका बंद असलेल्या जीनींग प्रेसींगमध्ये चक्क एमडी ड्रग्ज तयार करण्यात येत असल्याचे उघडकीस आल्याने, अकोला शहर आता विविध प्रकारच्या ‘ड्रग्स’चे मुख्य केंद्र झाल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत केलेल्या कारवाई नंतर या ठिकाणी ‘एमडी’ ड्रग्ज बनविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले असून ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरला जाणारा तब्बल 3 कोटी रुपयांचा कच्चा माल येथून जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले असून, अकोला शहर व जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची विक्री होते आहे, याची सहजपणे कल्पना येते.
बंद जिनींगमधून सुमारे ८० विविध पदार्थांचे नमुने जप्त केले असून ते तपासणीसाठी प्रयाेगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. या ८० नमुण्यांची तपासणी झाल्यानंतर तसेच अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा हाेणार. या ठिकाणावरुन जप्त करण्यात आलेला कच्चा मालाचे रात्री उशिरापर्यंत माेजमाप करण्यात आले असून एक काेटी रुपयांच्यावर हा आकडा असला तरी तीन काेटींच्या घरात या ड्रग्जची किंमत जाणार असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. मागील काही वर्षात राज्यात विविध ठिकाणी छापे टाकून एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रत्येक कारवाईत काेट्यवधींचा आकडा समाेर आला आहे. त्यामुळे जीनींग प्रेसींगमध्ये एम डी ड्रग्ज बनविण्याचा कारखानाच सुरु करण्यात आला हाेता. अशी माहीती पाेलिसांकडून प्राप्त झाली आहे.
बार्शिटाकळी ते महागाव राेडवर एक बंद पडलेली जीनींग प्रेसींग असून या ठिकाणी ड्रग्ज बनविण्यात येत असल्याची माहीती अकाेला पाेलिसांना मीळाली. या माहीतीवरुन पथकाने पाळत ठेउन बुधवारी सायंकाळी छापेमारी केली. या छापेमारीत सुमारे तीन काेटी रुपयांच्यावर किंमत असलेला कच्चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर घटनास्थळावरुन तीन आणि रात्री उशीर एकासह चार आराेपींनाही पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. आराेपी बाहेरच्या जिल्हयातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बार्शिटाकळी तालुक्यात चक्क ड्रग्ज बनविण्याचा कारखानाच पाेलिसांच्या या कारवाइने उघड झाल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या कारवाइमुळे जिल्हयात ड्रग्जची माेठ्या प्रमाणात तस्करी हाेत असल्याचे समाेर आले आहे. ही कारवाई पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा व बार्शिटाकळी पाेलिसांनी केली.
crime/police-raid-on-drug-factory-more-than-one-crore-raw-material-seized-at-akola