अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र राज्य नेत्र संघटनेच्या अध्यक्षपदी अकोल्याचे प्रख्यात नेत्र तज्ञ डॉ शिरीष थोरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सोलापूर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य नेत्र तज्ञ संघटनेच्या वार्षिक संमेलनात डॉ. थोरात यांना हे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. अकोल्याचे वैद्यकीय इतिहासात प्रथमच कुण्या नेत्ररोग तज्ञास हा मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. सदर संमेलनास प्रामुख्याने उपस्थित असलेले ऑल इंडीया नेत्र तज्ञ अससोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पार्थो विश्वास यांनी अध्यक्षपदाची सुत्रे डॉ. शिरीष थोरात यांचेकडे सोपविली.
संघटनेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीत उपाध्यक्ष पदावर मुंबई येथील डॉ. आनंद हेरूर व डॉ. अतुल कढाणे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. विरल शहा यांची सचीव पदावर तर डॉ. शोन चिंचोले यांची कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. डॉ पियुष बंसल पुणे यांची सायंटिफिक कमिटीचे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथील डॉ. राजेश जोशी, मुंबई येथील डॉ. प्रीती कामदार, औरंगाबाद संभाजी नगर येथील डॉ. अजय लोहिया यांचाही नुतन कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
संघटनेच्या ऍडव्हायझर बोर्डात तात्याराव लहाने,डॉ. ए.ए. देशपांडे, डॉ कुरेश मस्कत्ती मुंबई, डॉ. अनील कुळकर्णी मिरज, डॉ. सुनयना मलिक, डॉ.संतोष भिडे पुणे यांचा समावेश करण्यात आला आहे. संघटनेचे कार्य सोयीचे व्हावे म्हणून राज्यात पाच विभाग तयार करण्यात आले.त्यात विदर्भ विभागासाठी डॉ.मुंदडा, डॉ.डांगरा, डॉ भुईवार, डॉ प्रफुल्ल डाके, डॉ पंकज शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे आठ हजार नेत्र रोग तज्ञ असून त्यापैकी सुमारे चार हजार नेत्रतज्ञ या संघटनेचे सदस्य आहेत. एवढ्या मोठ्या संघटनेच्या अध्यक्ष पदावर डॉ. शिरीष थोरात यांची निवड करण्यात आल्याने अकोला जिल्ह्यात आनंद व्यक्त करण्यात येत असून अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यां निवडी बद्द्ल डॉ थोरात यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. डॉ थोरात सध्या विदर्भ नेत्र तज्ञ संघटनेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम बघत आहेत.