Thursday, December 12, 2024
HomeराजकारणOnly 14 Days ! मोदींच्या फक्त 3 सभा : मतदारांसाठी सर्वपक्षीय...

Only 14 Days ! मोदींच्या फक्त 3 सभा : मतदारांसाठी सर्वपक्षीय नेत्यांसह उमेदवारांची धावपळ

अकोला दिव्य ऑनलाईन : Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा प्रचार खऱ्या अर्थाने येत्या मंगळवार ५ नोव्हेंबरपासून सुरू होत असून प्रचारासाठी अवघे १४ दिवस मिळणार आहेत. या कालावधीत दोनच रविवार मिळणार असल्याने मतदारांपर्यंत पोहाेचण्यासाठी उमेदवारांना माेठी कसरत करावी  लागणार आहे. 

सध्या दिवाळीची धामधूम असल्याने प्रचार थंडावला आहे. दिवाळी ३ नोव्हेंबरला संपत आहे, तर ४ नोव्हेंबर ही अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर प्रचार १८ नोव्हेंबरला संपणार आहे. परिणामी प्रचारासाठी अवघे १४ दिवस मिळत आहेत. या कालावधीत  केवळ १० नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबरला रविवार आहे. रविवार प्रचाराचा वार ठरतो.

उमेदवारांचा कस लागणार 
प्रचारासाठी अवघे १४ दिवस मिळत असल्याने मतदारांपर्यंत पोहाेचण्यासाठी उमेदवारांचा कस लागणार आहे. त्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांना प्रचाराचे सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे. प्रचार रॅली आणि  नेत्यांच्या जाहीर सभा कुठे घ्यायच्या याचे वेळापत्रक करावे लागणार आहे.

सोशल मीडियाचा आधार   
सर्वपक्षीय उमेदवार सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाले आहेत. या माध्यमातून प्रचार केला जात आहे. आचारसंहिता लागू असल्याने सोशल मीडियावर प्रचार करताना  आयोगाने घातलेल्या अटी, शर्तींचे पालन उमेदवारांना करावे लागणार आहे. 

महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केवळ 3 सभांचे नियोजन करण्यात आले आहे. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांची सभा ८ नोव्हेंबर रोजी नाशिक मधील पंचवटी येथील तपोवनात असलेल्या मोदी ग्राऊंडवर होणार आहे.  

नाशिक पाठोपाठ मोदी यांची १२ नोव्हेंबर रोजी पुण्यातील एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर तर जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी मोदी यांची एकत्रित सभा १४ नोव्हेेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसीतील ग्रॅहमफर्थच्या मोकळ्या जागेत होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी विरोधी महाविकास आघाडीतील उद्धवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणार आहे.  

https://www.akoladivya.com/maharashtra/maharashtra-assembly election-2024-prime minister narendra modis only 3 rallys.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!