Thursday, December 12, 2024
HomeUncategorizedआपचे संदिप जोशी व मनसेचे शुक्ला यांचा अकोला भाजपात प्रवेश

आपचे संदिप जोशी व मनसेचे शुक्ला यांचा अकोला भाजपात प्रवेश

अकोला दिव्य ऑनलाईन : आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांच्या स्थापनेपासून अकोला शहरात या पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी सतत झटणारे आपचे संदिप जोशी आणि मनसेचे अरविंद शुक्ला यांनी खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, माजी महापौर विजय अग्रवाल, जयंत मसने, कृष्णा शर्मा, किशोर मांगटे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय विचारधारेने संविधानाचे रक्षण आणि संवर्धन झाले आहे. असे संदीप जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आम आदमी पार्टीचे संदीप जोशी आणि मनसेचे अरविंद शुक्ला यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी राजेश दिनोदिया, अमित शर्मा,शशिकांत जोशी, राजेश सकलेचा, हेमंत थाडा दिनेश खंडेलवाल, विक्रम झुनझूनवाला, मोहन पांडे, मनोजसिंह बिसेन, अनिल यादव, दीपक खेतान, मनमोहन जोशी, रोहित अग्रवाल, आनंद शुक्ला, मुन्ना जोगदंड, अखिलेश शुक्ला, संतोष यादव, राहुलजी लोहिया, अभिषेक गौतम, अमोल बड़े, त्रिलोक शुक्ला, अमन शुक्ला, सुनील शुक्ला, हरीश जांगीड़ अज्जू ठाकुर, वीरेंद्र खंडेलवाल, राहुल लोहिया, अनुराग झुनझुनवाला, शुभम ठाकुर, मनीष सिंह बिसेन, राजेश चौहान, गौरांग खेतान, रितेश वर्मा, करण शुक्ला, शिवम शुक्ला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन दिलीप मिश्रा तर प्रास्ताविक अँड. देवाशिष काकड आणि आभार प्रदर्शन संजय गोटफोडे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!