अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपमहायुतीचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचाराने वेग घेतला असून, शहराचे आराध्य दैवत राज राजेश्वरांचा आशीर्वाद घेऊन, विजय अग्रवाल यांनी संत कबीर नगर आणि विजय नगर येथील नागरिक व कार्यकर्त्यांशी समस्यांवर चर्चा केली. कबीर नगर येथील नागरिकांनी स्थानिक विकासाच्या कामांवर समाधान व्यक्त केले. विरोधक कितीही प्रयत्न करोत, पण तुमच्याच नेतृत्वाखाली विकासाची गंगा वाहत राहील.असं मत ज्येष्ठांनी व्यक्त केले. वेळी तरुण कार्यकर्त्यांनीही मतदारसंघाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
विजय नगर येथील नागरिक व कार्यकर्त्यांसोबत अग्रवाल यांनी संवाद साधला तेव्हा परिसरातील लोकांनी त्यांच्या पाठिंब्याची खात्री दिली. भाजप मुळेच परिसरात रस्ते, वीज, आणि पाण्याची समस्या दूर झाली आहे.असे सांगत लोकांनी समाधान व्यक्त केले.
विजय नगरच्या तरुणांनी रोजगार आणि शिक्षणाच्या संधींवर भर देण्यासाठी आपले विचार मांडत विकासासाठी सहकार्याचे वचन दिले. महिलांनीही आपल्या परिसरातील सुरक्षा व आरोग्यविषयक सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.