अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अत्यंत अटीतटीच्या लढतीत अँड प्रकाश आंबेडकर यांनी पुरस्कृत केलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हरिश आलीमचंदानी यांचा प्रचाराचा झंझावात बघून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. ठिकठिकाणी आयोजित कॉर्नर मिटींग मध्ये स्थानिक लोकांसोबत संवाद साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.तेव्हा नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच शहराचा विकास साधण्याचे आश्वासन आलिमचंदानी यांनी दिले.
सिंधी कँप,पक्की खोली, कच्ची खोली येथील नागरिक नेहमीच आपल्या पाठीशी असून आमदार होऊन अकोला शहराच्या विकासाची स्वप्ने पूर्ण करा असा मतदारांनी आशीर्वाद दिला.तर
शहरासाठी विकासात्मक योजना राबवून भविष्याचा दृष्टिकोन ओळखून विकासाची ब्लू-प्रिंट तयार केली आहे अशी माहिती आलीमचंदानी यांनी दिली.
निवडणुकीमध्ये आपले मत योग्य उमेदवाराला गेले पाहिजे. यासाठी त्यांनी मतदारांना साद घातली आणि मतदारांनी जोरदार समर्थन केले.अकोला पश्चिम मतदारसंघात मतदारांचा वाढता प्रतिसाद बघता मला विजयाची खात्री असल्याचा विश्वास आलीमचंदानी यांनी यावेळी व्यक्त केला.