Wednesday, December 11, 2024
HomeUncategorizedअकोला पश्चिमचा गड तब्बल 30 वर्षांनंतर कॉंग्रेसच्या ताब्यात !

अकोला पश्चिमचा गड तब्बल 30 वर्षांनंतर कॉंग्रेसच्या ताब्यात !

अकोला दिव्य ऑनलाईन : भारतीय जनता पक्षाचा अभेद्य किल्ला असलेला अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात शेवटच्या फेरीपर्यंत निकराचा लढा देत तब्बल 30 वर्षांनंतर कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार साजीद खान पठाण यांनी भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांचा पराभव करून अखेर कॉंग्रेसचा झेंडा फडकवला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत विजय अग्रवाल यांचा 1 हजार 283 मतांनी पराभव करुन साजीद खान पठाण विजय खेचून आणला. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून तर थेट 1995 पर्यंत मतदारसंघावरचा काँग्रेसचा सुर्य कधी मावळलाच नव्हता.

अकोला पश्चिम मतदारसंघात उमेदवार जाहीर झाल्यापासून संपूर्ण पश्चिम विदर्भाचे येथील लढतीकडे लक्ष लागून राहिले होते. आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून कॉंग्रेसचे पठाण यांनी भक्कम आघाडी घेतली.जवळपास 12 व्या फेरीपर्यंत अग्रवाल 25 हजार मतांनी माघारी होते. मात्र 13 व्या फेरीनंतर त्यांनी पठाण यांचे मताधिक्य कमी करण्यास सुरुवात केली. 21 व्या फेरीची मतमोजणी पुर्ण झाल्यावर अग्रवाल यांना 81 हजार 91 तर पठाण यांना 86 हजार 724 मते मिळाली होती. अग्रवाल अवघ्या 5 हजार 633 मतांनी मागे होते. शेवटच्या 22 व्या फेरीत चमत्कार घडेल असे वाटत होते. अग्रवाल यांना शेवटच्या या फेरीत तब्बल 5 हजार 283 मते देखील मिळाली. पण पठाण यांनाही या फेरीत 711 मते मिळाली आणि भाजपचे अग्रवाल यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला.

Oplus_131072

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या लढतीत भाजपचे बंडखोर आणि वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार हरिशभाई आलीमचंदानी, भाजपचे बंडखोर डॉ. अशोक ओळंबे पाटील व उध्दव ठाकरे गटाचे मात्र अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांच्या उमेदवारीने चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे आज सर्वांचं लक्ष मतमोजणीकडे होते. मतमोजणीच्या अंतिम निकालात हरीश आलिमचंदानी यांना 21 हजार 163 तर राजेश मिश्रा यांना 2 हजार 607 आणि डॉ. अशोक ओळंबे पाटील यांना 2 हजार 47 मते मिळाली आहे.भाजपच्या दोन्ही बंडखोरांना 23 हजार 210 मते मिळाली.

तत्कालीन अकोला मतदारसंघात 1995 पर्यंत या मतदारसंघाचे नेतृत्व माजी मंत्री नानासाहेब वैराळे, जमनालाल गोयनका, प्रा. अझहर हुसेन आणि अरुण दिवेकर यांच्यासारख्या दिग्गजांनी केलं आहे. मात्र, 1995 पासून आजपर्यंत तब्बल सहावेळा या मतदारसंघात भाजपचं कमळ फुललंय. भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी तब्बल सहावेळा सलग हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राखला. 2023 मध्ये निधन होईपर्यंत तेच पक्षाचे आमदार होते.

1995 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होताय. मात्र, काँग्रेसच्या या गडाला अंतर्गत मतभेदांचा विळखा पडला अन् हा मतदारसंघ अलगद भाजपच्या ताब्यात गेला. 1995 पासून या मतदारसंघात काँग्रेसकडून प्रा. अजहर हुसेन, अरूण दिवेकर, रमाकांत खेतान (दोन वेळा), उषा विरक आणि साजीदखान पठाण यांचा पराभव झाला आहे. मात्र, 2019 मध्ये काँग्रेसच्या साजिदखान पठाण यांचा अवघ्या 2593 मतांनी पराभव झाला होता. तर आताच्या लोकसभेत या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना 12 हजारांवर मतांची आघाडी होती. त्यामूळे काँग्रेसला यावेळी संधी असल्याचं वाटत होतं आणि ती संधी साधुन घेतली.

छायाचित्र निरज भांगे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!