Wednesday, December 11, 2024
HomeUncategorizedअकोल्यात भजन स्पर्धा ! धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, स्वरदा भजनी मंडळाचा...

अकोल्यात भजन स्पर्धा ! धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, स्वरदा भजनी मंडळाचा संयुक्त उपक्रम

अकोला दिव्य ऑनलाईन : ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, नीलेश देव मित्र मंडळ व स्वरदा भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गुरूवर्य स्व. बाबाराव फोकमारे स्मृतीप्रित्यर्थ भव्य महिला भजनी मंडळ स्पर्धा शुक्रवार २७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता अभिरुची गार्डन, व्दारका नगरी , नानासाहेब पाटील मार्केट मागे उमरीरोड येथे आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा न्यू तापडिया नगर, जठारपेठ, तापडिया नगर व रामदासपेठ या भागातील महिला मंडळासाठी खुली राहिल.

प्रत्येक ग्रुपला सादरीकरणासाठी १० मिनिटे देण्यात येईल. भजन मराठी व हिंदी भाषेत चालतील. प्रत्येक ग्रुप मध्ये जास्तीत जास्त १५ तर कमीत कमी १० महिला हव्यात. सादरीकरणासाठी लागणारे वाद्य आपण सोबत आणावे. महिला भजनी मंडळांनी स्पर्धेसाठी नोंदणी करावी. विजेत्या महिला भजनी मंडळांनी प्रथम पारितोषीक हॉर्मोनियम, द्वितीय तबला, तृतीय टाळ (२० चा संच) व प्रोत्साहनपर पारितोषीक देण्यात येईल. अधिक माहितीस्तव 9765901122,8329316212,7875853191 या दुरध्वनी क्रमांक संपर्क साधावा आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!