अकोला दिव्य न्यूज : Jalgaon Pushpak Train Accident Latest Updates : पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी रेल्वेला आग लागल्याच्या भीतीने धावत्या रेल्वेतून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं आणि यामध्ये काही प्रवाशांचि मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान रेल्वे अधिकारी आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव- मुंबई रेल्वे मार्गावर माहिजी व पारधाडे स्थानकादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली आहे.

जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
या दुर्घटनेबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती देताना सांगितले की, मध्य रेल्वेच्या कंट्रोल रुमकडून माहिती देण्यात आली की, कर्नाटक एक्सप्रेसबरोबर एक अपघाताची घटना घडली, ज्यामध्ये ७ ते ८ लोक जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. प्रांत अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस अधिकारी देखील पोहचले आहेत.रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील दुर्घटनेनंतर मदतकार्य करत आहेत.
ग्रामीण रुग्णालय, खाजगी रुग्णालय आणि शासकिय वैद्यकीय महाविद्यालय या तीन रुग्णालयाकडून मदत घेतली जात आहे. त्यामध्ये सर्व रुग्णांना मदत केली जात आहे असेही प्रसाद म्हणाले. प्राथमिक माहितीनुसार, ६ ते ८ चा आकडा सांगितला जात आहे. अजून अधिकृत आकडेवारी मिळालेली नाही. सध्या आपली प्राथमिकता जखमींना उपचार देण्याची आहे, असेही आयुष प्रसाद म्हणाले.

प्रवाशांनी दिलेली माहिती अशी, आम्ही पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवास करत होतो, पण रेल्वेला अचानक ब्रेक लावला यावेळी ठिणग्या मोठ्या प्रमाणात उडाल्या. यावेळी प्रवाशांना आग लागली असं वाटले, यामुळे प्रवाशांनी अचानक रेल्वेतून उड्या मारण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्या ट्रॅक वरुन बंगळुरु एक्सप्रेस गाडी येत होती. या रेल्वेखाली अनेक प्रवाशी चिरडल्याची भीती आहे rumors-of-a-fire-on-pushpak-express-in-jalgaon-passengers-panicked