अकोला दिव्य न्यूज : पश्चिम विदर्भातील बांधकाम क्षेत्रातील मार्वेल ट्रिनिटी एल.एल.पी या बांधकाम कंपनीचे संचालक आणि बिल्डर्स सुनील इन्नानी यांचे वडिल माणिकलाल मुरलीधर इन्नानी यांचे वृध्दापकाळाने आज रविवार २६ जानेवारीला निधन झाले. मृत्यू समयी त्यांचं वय 93 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले संजय व सुनील आणि दोन मुली, सुना, जावई, नात नातवंडे आणि मित्रांसह मोठे आप्त कुटुंब आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवासी व माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि व्यवसायीक माणिकलाल इन्नानी आपल्या मनमिळाऊ स्वभाव आणि धार्मिक वृत्तीमुळे सर्वच समाजात सलोख्याचे संबंध ठेवून होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
त्यांची अंतिम यात्रा उद्या सोमवार 27 जानेवारी रोजी मेहकर येथील राहते निजी निवासस्थानावरुन मोक्षधाम साठी निघणार असून त्या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.