Saturday, February 15, 2025
HomeUncategorizedराहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल : पोलिसांना दिली होती तक्रार

राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल : पोलिसांना दिली होती तक्रार

अकोला दिव्य न्यूज : Rahul Gandhi Marathi News: नेताजी सुभाषचंद्र बोस यांची २३ जानेवारी रोजी जयंती होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केले. त्यांनी केलेल्या पोस्टवर आक्षेप घेत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
दक्षिण कोलकातामधील भवानीपूर पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दिली होती. ” जानेवारी २०२५ रोजी राहुल गांधींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन करणारी पोस्ट केली. त्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या तारखेबद्दल महासभेने आक्षेप घेतला आहे. 

या पोस्टविरोधात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या घराबाहेर महासभेच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात निदर्शने केली. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रचूड गोस्वामी म्हणाले की, राहुल गांधी तोच वारसा पुढे चालवत आहे, ज्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आधी काँग्रेस आणि नंतर देश सोडायला भाग पाडले. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाने नेहमीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृती पुसण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळीही त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल चुकीची माहिती दिली आहे.

पोस्टवरून राहुल गांधी यांच्यावर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकनेही टीका केली आहे. ही ती संघटना आहे, जिची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर केली होती. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपनेही राहुल गांधींवर या पोस्टवरून टीका केली आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!