गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असलेल्या करदात्यांचा कर माफ करण्याची सगळ्यात मोठी घोषणा करून करोडो करदात्यांना अनपेक्षित असा सुखद धक्का दिला आहे. परंतू, ही करमाफी केवळ नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांना (New Tax Regime Updates 2025) लागू होणार आहे. जुनी कर प्रणाली निवडलेल्या करदात्यांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही. १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करत मध्यमवर्गाला सगळ्यात मोठा दिलासा आहे. मात्र आता या घोषणेमुळे दर महिन्याला १ लाख रुपये पगार घेणाऱ्या व्यक्तीलादेखील कर भरावा लागणार आहे.हे वेगळे सांगायला नको.

अर्थमंत्र्यांनी नव्या कर प्रणालीत आमूलाग्र बदल केला आहे. आधी ७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं. आता ही मर्यादा थेट १२ लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. नव्या कर प्रणालीत मोठा बदल घडवणाऱ्या सरकारनं जुन्या कर प्रणातील बदल केला नाही. सरकारनं १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत नवी कर प्रणाली अधिक लोकप्रिय करण्यासाठी हा नवीन बदल केला आहे.
सरकारनं नवी कर प्रणाली २०२० मध्ये आणली. पण त्यावेळी अनेकजण ही कर प्रणाली निवडत नव्हते. त्यानंतर सरकारनं नव्या कर प्रणालीत सातत्यानं बदल केले.
मागील अर्थसंकल्पात नव्या कर प्रणालीच्या अंतर्गत ७ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं. आता हीच मर्यादा थेट ७ लाखांपर्यंत नेण्यात आली. १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत सरकारनं मध्यम वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. देशातील करदात्यांची संख्या ८ कोटी ६० लाख इतकी आहे. यातील ६५ टक्के करदात्यांनी नवी कर प्रणाली स्वीकारलेली आहे. याचा अर्थ तीनपैकी दोन करदाते नव्या कर प्रणालीनुसार कर भरतात.उरलेले एक तृतीयांश करदाते अजूनही जुन्या कर प्रणालीनुसार कर भरतात.

देशातील एकूण करदात्यांची संख्या सध्या ८ कोटी ६० लाख आहे.
सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात आणलेल्या नवी कर प्रणाली पासून बहुतांश करदाते त्यापासून चार हात लांब राहिले. कारण त्यांना जुनी कर प्रणाली फायदेशीर वाटत होती. पण आता मोदी सरकारचं संपूर्ण लक्ष नव्या कर प्रणालीवर आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा नेमका ‘प्लान’ काय हे जाणून घेतलं तर सरकारच्या रडारवर नेमक आहे हे स्पष्ट होते.
नवा टॅक्स स्लॅब कसा?
० ते ४ लाख- शून्य कर
४ ते ८ लाख- ५%
८ ते १२ लाख- १०%
१२ ते १६ लाख- १५%
१६ ते २० लाख-२०%
२० ते २५ लाख- २५%
२५ लाखांपुढे- ३०%
जुना टॅक्स स्लॅब कसा?
० ते २.५ लाख- ०
२.५ ते ५- ५ लाख- ५%
५ ते १० लाख- २०%
१० लाखांहून जास्त- ३०%