अकोला दिव्य न्यूज : विद्यार्थ्यांवर मूळ संस्कार शाळेद्वारेच होत असतात.पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासासोबत विद्यार्थ्यांमधील विविध कला गुणांची जोपासना करीत शिक्षकांनी त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणावा. असे विचार व्यक्त करताना मान्यवरांनी सेंट पॉल्स पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.

अकोट शहरालगत असलेल्या तांदळवाडी फाटा येथील सेंट पॉल्स पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच थाटात पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आ.वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते आणि पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष रेखा खंडेलवाल, शाळेचे अध्यक्ष नवनीत लखोटिया, उपाध्यक्ष लुनकरण डागा, सचिव प्रमोद चांडक, दीपम लखोटिया, कृष्णा लखोटिया, शारदा लखोटीया, रेखा चांडक, सुधा डागा, अवनी लखोटिया, विजय बिहाडे,चंद्रकांत तिवारी, पालक प्रतिनिधी प्रकाश हरणे, श्रीकांत गायगोले, अंकित देवळे, सुजित मोहरूत, अख्तर शेख, गजानन भागवतकर, मंजू बोचे, शितल भुतडा, रक्षा राठी, अर्चना कराड, प्राचार्य द्वारिकाप्रसाद बसेर, उपप्राचार्य कविता मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती माता व गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच मान्यवरांचे कुंकुम तिलक लावून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व स्वागत नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. उपप्राचार्या कविता मिश्रा यांनी स्वागतपर भाषण केले. प्राचार्य द्वारिकाप्रसाद बसेर यांनी वार्षिक अहवाल सादर केला.
यंदा संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाली असून संस्थेचा सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा प्रवास, त्यातील चढ-उतार उपप्राचार्य कविता मिश्रा यांनी मांडला व त्यावर आधारित शाळेतील शिक्षकांनी सुंदर नृत्य सादर करून संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा केला.
कार्यक्रमाची थीम इसेन्स ऑफ भारत (भारताचे सार) ला अनुसरून पोवाडा, कोळी नृत्य, बिहू, गरबा, गोंधळ, कथ्थक, शिव तांडव, घुमर अशा विविध नृत्यातून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, आनंद, उत्साह ओतप्रोत झळकत होता. नर्सरी ते वर्ग नववी मधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय सुंदररित्या केले. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या धाडस व आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक केले. वर्ग आठवी मधील देवयानी येवतकर हिने आपल्या सुमधुर गीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत केला. मान्यवरांनी सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. शानदार कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अभिषेक गुजर तर आभार प्रदर्शन किरण ढगेकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.