Sunday, March 23, 2025
HomeUncategorizedअकोला : विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू… मशीन रिव्हर्स घेतांना दिली धडक

अकोला : विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू… मशीन रिव्हर्स घेतांना दिली धडक

अकोला दिव्य न्यूज : येळवण शिवारातील दत्तवाडी जवळ रोडचे काम सुरू असताना ग्रेडिंग मशिन चालक आपली मशिन मागे (रिव्हर्स) घेत असताना या रस्त्यावरुन मोटारसायकलने जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या मोटारसायकलला मशिनची धडक लागली. यामुळे विद्यार्थी रस्त्यावर पडला आणि त्याच वेळी मशिनचे चाक त्याच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच चालकाने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच बोरगावमंजू व बार्शीटाकळी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून तातडीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

कानशिवनी येथील सुमित कैलास ढोरे आपल्या एम एच ३० व्ही ६६४० या क्रमांकाचा हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलने कॉलेज करीता जात असताना येळवण शिवारातील दत्तवाडी जवळ रोडचे काम करताना ग्रेडर या मशीनच्या चालकाने मशीन रिव्हर्स घेत असताना, मोटारसायकलने जात असलेल्या सुमित ढोरेला धडक दिली. तो रस्तावर पडता क्षणीच त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रेडर मशीनच्या चालकाचे लक्षात आल्यानंतर चालकाने तेथून पळ काढला.

येवता रोडचे काम सुरू असून टाकलेल्या मुरूमचे लेवल करण्याकरिता मशीन चालवताना चालकाच्या निष्काळजीपणाने विद्यार्थ्यांला आपला जीव गमवावा लागला. मशीन चालकासोबत मशीन मागेपुढे घेण्याकरिता एक कामगार असता तर हा अपघात टळला असता. ग्रेडर मशीन वर नंबर प्लेट नसल्यामुळे मशीन चालक-मालक व प्रशासनाबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे

कानशिवणी येथील कैलास ढोरे यांना दोन मुले अओ त्यामधील सुमित हा लहान होता. अकोला येथील मेहरबानू कॉलेज येथे बीसीए प्रथम वर्षांमध्ये शिक्षण घेत होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!