Saturday, March 22, 2025
HomeUncategorizedमोठी बातमी ! आता रन आऊट व स्टम्पिंगचा नियम बदलला ; आऊट...

मोठी बातमी ! आता रन आऊट व स्टम्पिंगचा नियम बदलला ; आऊट करण्यासाठी काय करावं लागणार जाणून घ्या…

अकोला दिव्य न्यूज : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आता एक मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. क्रिकेटमध्ये रन आऊट आणि स्टम्पिंग या दोन महत्वाच्या गोष्टी असतात. पण या दोन्ही बाद करण्याच्या पद्धतीमध्ये आता मोठा बदल करण्यात येणार आहे.

यापूर्वी रन आऊट आणि स्टम्पिंगचा नियम काय होता… यापूर्वी रन आऊट आणि स्टम्पिंगचा नियम ठरलेला होता. खेळाडू जर क्रीझमध्ये नसताना जर खेळाडूला रन आऊट केले तर त्याला बाद दिले जायचे, दुसरीकडे फलंदाज फटका मारताना क्रिझमध्ये नसला आणि यष्टीरकाने बेल्स उडवले तर फलंदाजाला बाद दिले जायचे. पण आता या नियमात बदल झाला आहे.

आता रन आऊट कसे दिले जाणार… जर एखादा खेळाडू धाव घेत असताना धावत असेल आणि तो क्रीझमध्ये पोहोचू शकला नसेल तर त्याला बाद दिले जात होते. त्यावेळी बेल्स फक्त थोडीशी उडालेली असेल तरी चालत होते. पण आता बेल्स पूर्णपणे उखडल्या गेल्याशिवाय बाद दिले जाणार नाही.आता स्टम्पिंग कसे बाद दिले जाणार…

जर खेळाडू फटका मारण्यासाठी पुढे सरसावला आणि यष्टीरक्षकाने बेल्स उडवली तेव्हा लगेच त्याला बाद दिले जाणार नाही. जेव्हा स्टम्पिंग करताना पूर्णपणे बेल्स उखडली गेली असेल त्यावेळी फलंदाजाला स्टमिंग बाद दिले जाणार आहे.

हा नियम कुठे लागू करण्यात येणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हा नियम आणला असला तरी तो या स्पर्धेसाठी नाही. हा नवीन नियम सुरुवातीला WPL 2025 मध्ये आता लागून करण्यात येणार आहे. त्यानंतर हा नियम बीसीसीआय अन्य स्पर्धांमध्ये लागू करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण सुरुवातीला तरी हा नियम फक्त महिलांच्या स्पर्धेत दिसणार आहे, नंतर आयपीएलमध्येही हा नवीन नियम पाहाला मिळू शकतो.

बीसीसीायने प्रयोगिक तत्वावर आता हा नवीन नियम आणला आहे. त्यामुळे या नियमाचा कसा अवलंब केला जातो, हे बीसीसीआय पाहणार आहे. त्यानंतर हा नियम अन्य स्पर्धांमध्येही राबवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!