Saturday, March 22, 2025
HomeUncategorizedमाजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची अखेर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची अखेर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

अकोला दिव्य न्यूज : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वीय सहायक आणि एका पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयात वारंवार गैरहजर राहणाऱ्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयाने दणका दिला. जाधव यांना न्यायालयाच्या आदेशाने नागपूर पोलिसांनीओ अटक केली. मात्र, छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती ठिक झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता पोलिसांनी मेयो रुग्णालयातून ताब्यात घेतले आणि थेट मध्यवर्ती कारागृहात डांबले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करण्याची घटना १७ डिसेंबर २०१४ रोजी वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये घडली. त्या दिवशी उद्धव ठाकरे यांची बैठक सुरु होती. त्यांनी बैठक संपेपर्यंत कोणालाही आतमध्ये प्रवेश देण्यास मनाई केली होती. दरम्यान, माजी आमदारा हर्षवर्धन जाधव हॉटेलमध्ये गेले असता सुरक्षा ताफ्यात समावेश असलेले ‘स्पेशल प्रोटेक्शन युनीट’चे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी त्यांना आतमध्ये सोडण्यास नकार दिला. परिणामी, हर्षवर्धन जाधव चिडले व त्यांनी पराग जाधव यांना थापड मारली आणि तेथून निघून गेले.

त्यानंतर सोनेगाव पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविला व प्रकरणाच्या तपासानंतर सत्र न्यायालयात खटला दाखल केला. तो खटला न्यायाधीश एस. एम. जी. बैस यांच्यासमक्ष प्रलंबित आहे. न्यायालयात खटला सुरु असताना न्यायधीशांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या खटल्याच्या तारखांना जाधव वारंवार अनुपस्थित राहत होते. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केला होता.

परिणामी, जाधव यांनी सोमवारी न्यायालयात हजर होऊन अटक वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा न्यायालयाने त्यांना, ते स्वत:च्या बचावासाठी कोणते साक्षीदार तपासणार आहेत, अशी विचारणा करून साक्षीदारांची यादी मागितली. परंतु, जाधव यांनी याकरिता १० दिवसांचा वेळ देण्याची मागणी केली. त्यांचा हा निष्काळजीपणा खटकल्यामुळे न्यायालयाने पोलिसांना अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.सायंकाळी मध्यवर्ती कारागृहात रवाना केले.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी सोमवारी दुपारी चार वाजता ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान, जाधव यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार डॉक्टरांकडे केली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. मंगळवारी दुपारी डॉक्टरांनी जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आणि सायंकाळी  मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!