अकोला दिव्य न्यूज : आंतरराज्यटोळीने क्रिकेट व इतर खेळावर सट्टा लावण्याचे अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात तयार केलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अत्यंत शिताफीने छापा टाकून अकोला शहरातील गोरक्षण रोड, जुने इन्कम टॅक्स चौकात असलेल्या ‘हॉटेल वैभव’च्या संचालकासह तब्बल ३३ आरोपींना रंगेहात जेरबंद केले.या मोठ्या कारवाईत आरोपीकडून २८.३६ लाखांचा मु्द्देमाल जप्त केला आहे.

कातखेड गावात रवींद्र पांडे यांच्या शेतातील ३ मजली इमारतीमध्ये अवैधरित्या विनापरवाना पैशांचे ऑनलाइन खेळ खेळले जात आहे. अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांना मिळाली.पोलीस अधिकारी व पथकाने सुनियोजित छापा टाकला. यावेळी ३३ आरोपी आढळून आले.संकेतस्थळ व ॲपचा वापर करून क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, कसिनोगेम, ऑनलाईन गेम आदीचा सट्टा आरोपी चालवत होते. व्हॉट्सअप, टेलिग्रामसारख्या समाज माध्यमांच्या समुहावरून त्याची जाहिरात करून ग्राहक मिळवले जात होते.

ग्राहकांकडून ऑनलाइन पैसे घेऊन त्यांची आयडी तयार केली जात होती. त्यांच्या आयडीवर सट्टा खेळवून जिंकलेल्या किंवा हरलेल्या पैशांची देवाण-घेवाण करण्यात येत असल्याचे आढळून आले. मालक रवींद्र पांडे याने सट्टा चालविण्यासाठी संजय गुप्ता व मोनीश गुप्ता यांना जागा उपलब्ध करून दिली होती. त्यांनी फरार आरोपी महेश डिक्कर रा. लोहारी ता. अकोट याच्या माध्यमातून आरोपींची टोळी जमवली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गुजरात राज्यातील सहा, उत्तर प्रदेश तीन, बिहार व मध्य प्रदेश राज्यातील प्रत्येकी एक महाराष्टातील चंद्रपूर, पुणे, मुंबई, अमरावती बुलढाणा येथील आठ व अकोला जिल्ह्यातील १४ आरोपींचा समावेश आहे. आरोपींकडून १२ लॅपटॉप, ११३ मोबाईल, १० बँकेचे पासबुक, दोन पासपोर्ट, १३ एटीएम कार्ड, १२ राउटर व मोडेम, जुगार खेळण्यासाठी वापरलेली सर्व साहित्य असा एकूण २८ लाख ३६ हजार २६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सर्व आरोपींविरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात ६०/२०२५ कलम कलम ३१८ (४), ११२ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता सहकलम ४, ५ महा. जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व पथक प्रकरणाचा तपास करीत आहे. गुन्ह्यातील आरोपीपैकी मुख्य सुत्रधार कोण ? याचा तपासादरम्यान शोध घेण्यात येत आहे.

असा चालयचा सट्टा
सट्टा चालविण्यासाठी समाजमाध्यमातून वेब आयडी उपलब्ध करून दिली जात होती. याद्वारे ग्राहक सट्टा खेळत होते. कारवाईमध्ये विविध बँकांचे ५४ खाते निष्पन्न झाले. खातेदाराविषयी संबधित बँकेला पत्रव्यवहार सुरू आहे.
अकोला जिल्ह्यातील आरोपी
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चिंचखेड लाहोरी येथील प्रसनजीत नाजुकराव वानखडे (वय २५), अजय कैलास गवई (वय २८), अशोक सम्राट सपकाळ (वय ३७), विश्वजीत कैलास गवई (वय२०), विकास बुध्द प्रकाश सपकाळ (३६), मुंडगाव येथील भूषण दिनेश बाहकर(३०)लोहारी येथील विनोद सुखदेव डिक्कर(४४) तसेच मोरगाव भाकरे येथील स्वप्नील मिलींद शिरसाट (वय ३८) तेल्हारा येथील निखिल सुभाष वानखडे (वय२२) कळंबेश्वर येथील प्रविण बळीराम सिरसाठ (२४) हे अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बार्शिटाकळी तालुक्यातील आरोपी आहेत.

अकोला पोलिसांची मोठी कारवाई
सदरची कार्यवाही अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, एलसीबी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, माजीद पठाण, दशरथ बोरकर स. फौ. राजपालसिंह ठाकुर, पोलीस कर्मचारी गणेश पांडे, फिरोज खान, भास्कर थोत्रे, सुलतान पठाण, प्रमोद ढोरे, रविंद्र खंडारे, खुशाल नेमाडे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसिमोद्दीन, उमेश पराये, अंमलदार लिलाधर खंडारे, स्वप्निल खेडकर, आकाश मानकर, उदय शुक्ला, स्वप्निल चौधरी, अभिषेक पाठक, राहुल गायकवाड, अशोक सोनवणे, भिमराव दिपके, मोहम्मद आमीर, सुमित राठोड, गंगाधर धुंपडवाड, चालक अंमलदार ग्रेड ग्रेट पोलीस उपनिरीक्षक विनोद ठाकरे, पोलिसा अतदार प्रविण कश्यप अक्षय बोबडे, महिला पो. हवा. तुळसा दुबे यांनी कारवाई पार पडली.
