अकोला दिव्य न्यूज : मागील काही दिवसांपासुन अकोट शहरात तसेच ग्रामीण भागात मुख्य रस्त्यावर खूप मोठया प्रमाणात अपघात वाढले असून त्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी जात आहे. कित्येक लोकांना कायमच अपंगत्व प्राप्त होत आहे. यासाठी वारंवार आंदोलन करून सदर बाब आणि त्यावरील उपायोजना अधिकाऱ्यांच्या लक्षात आणूनही प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना केल्या जात नाही आहे. या अगोदर ६ वर्षाच्या मुलीचे निधन झाले. काल पोलीस स्टेशनसमोर मोठा अपघात झाला. तेव्हा रास्ता रोको आंदोलन सुद्धा करण्यात आले. तेव्हा या सर्व समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्या, अन्यथा दुसरा मार्ग अवलंबला जाईल असा इशारा देत निवेदन सादर करण्यात आले. उबाठा शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अकोला जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन उपरोक्त निवेदन सादर करण्यात आले.

सदर निवेदनामध्ये अकोट अकोला रोडवर स्ट्रीट लाईट बसविणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री शिवाजी कॉलेज व अकोला रोडवरील लाल बहादूर शास्त्री शाळेपर्यंत गतिरोधक बसविणे,कलदार चौक ते रेल्वे पटरीपर्यंत पर्यंत रोड दुरुस्त करणे,सोनू चौक ते मच्छीमार्केट पर्यंत रोड दुरुस्त करणे,अकोला रोड वरील रेल्वेपुलावर स्ट्रेटलाईट व गतिरोधक बसविणे,ग्रामीण भागात हिवरखेड मार्ग – उमर फाटा,वडाळी सटवाई,अडगाव खुर्द,अंजनगाव मार्ग – वाई फाटा,पणज,रुईखेड फाटा,दर्यापूर रोड – ढगा फाटा,अकोला रोड – तांदुळवाडी फाटा, वणी वारुळा,देवरी फाटा,या ठिकाणी अपघातांचे प्रमाण खूप मोठया प्रमाणात वाढले असून यावर आपण त्वरित उपाययोजना कराव्यात,या सर्व समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्या यासाठी निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, जिल्हा समन्वयक श्याम गावंडे,रमेश खिरकर,गजानन नगमते,जि.प.सदस्य राजू मोरे,जगन्नाथ निचळ,अवि गावंडे,कमल वर्मा,प्रशांत येउल,विजय ढेपे,शिवाजी कदम,राहुल पाचडे,सुनील रंदे,नितीन गोउंडागरे,प्रणव चोरे प्रफुल्ल धमाणे, सुभाष सुरत्ने,नंदकिशोर कुलट,गुरुभाई,विकास मोरे,भगवंत नीतोने,मुकेश ठोकळ,संदीप बोरोडे,विजय जवंजाळ, गजानन कोलखेडे,निवृत्ती लोखंडे,अरूण इंगळे,गणेश चंडालिया ज्ञानेश्वर चौधरी,संजय गयधर,विकास शेंडे,अवेश अहमद,देवा मोरे,अमोल बदरखे,,अक्षय केदार,प्रेमकुमार झापे,साहेबराव पवार,रोहित सुरत्ने,दिपराज भारसाकळे, विश्वासराव पवार यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.