Wednesday, August 6, 2025
HomeUncategorizedविदर्भ गौरव ! अकोल्यातील सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व नाट्य निर्माता सचिन गिरी...

विदर्भ गौरव ! अकोल्यातील सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व नाट्य निर्माता सचिन गिरी सन्मानित

अकोला दिव्य न्यूज : अकोल्यातील सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, नाट्य निर्माता आणि नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात “विदर्भ गौरव 2025 ” वीर शिव छत्रपती संघटना व एस आर एन फिल्म प्रोडक्शन आणि न्यूज इंडिया 24 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात सचिन गिरी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत राजे मुधोजी भोसले महाराजा ऑफ नागपूर आणि नागपूर शहराचे डी.वाय.एस पी अशोक बागुल प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजक शितल नंदनवार होत्या. यावेळी सिने अभिनेता सागर निकम, दिशा देशमुख यांच्या उपस्थितीसह सिने, कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्रातील विविध व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. सचिन विजय गिरी हे सिद्धी गणेश प्रोडक्शन या नाट्य संस्थेचे संस्थापक आहे. त्यांनी या नाट्य निर्मिती संस्थेमार्फत तरुण पिढीमध्ये नाटकाची आवड निर्माण व्हावी म्हणून मागील पंधरा वर्षापासून नि:शुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून तरुण पिढीला नाट्य विषयाची आवड निर्माण करून त्यांना रंगमंचावर काम करता यावे म्हणून नाट्य निर्मिती करून त्यांना अनेक मराठी हिंदी नाटकांच्या माध्यमातून रंगमंच उपलब्ध करून दिला.

त्यांनी ‘मुझमें जिंदा है तू’ ‘मी तुझीच’ मीच तो! ‘काली’ प्रेग्नेंट, लास्ट प्ले, मै वही हूं, संगीत सरस्वतीच्या साक्षीने, अघोरी, सजेशन या मराठी, हिंदी नाटकांचे लेखन केले असून, मुझमें जिंदा है तू, मीच तो…, मी तुझीच, काली, वृंदावन, प्रेग्नेंट, सारी रात्र, नागमंडल, चिंदी बाजार, फ्रेंडशिप, दर्द पोरा, प्लॅटफॉर्म, गटार या नाटकाची निर्मिती केली आहे. “क्षण “ हिंदुस्तानी “ भारत इंडिया” सुरक्षा” मुझको डर लग रहा है…” इत्यादी शॉर्ट फिल्मचे लेखन दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. शिवाय विदर्भातली एक मात्र स्पर्धा जी मागील अकरा वर्षापासून सातत्याने स्वातंत्र्य करंडक विदर्भस्तरीय एकांकिका स्पर्धा या नावाने 15 ऑगस्ट रोजी अकोला येथे असते, तीचे आयोजन सचिन गिरी करीत आहेत.

अकोल्यातील असलेल्या आर.डी.जी महिला महाविद्यालयामधील आरडीजी फिल्म थेटर अँड ड्रामॅटिकचे सचिन गिरी संचालक आहेत. मागील आठ नऊ वर्षापासून राज्य नाट्य स्पर्धेला समन्वयक म्हणून कार्य करीत आहेत. अनेक नाट्य स्पर्धेला परीक्षक म्हणून कार्य केले आहे. या सर्व कार्याची दखल घेत.” विदर्भ गौरव पुरस्कार “ एका मोठ्या समारंभात त्यांना देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर निकम आणि आणि त्यांचे सहकारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर निकम, शितल नंदनवार दीक्षा देशमुख आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!