Thursday, September 18, 2025
HomeUncategorizedअलका बियाणी उवाच ! शिक्षण पैसा मिळवण्याचे साधन नाही तर आनंदी जीवनाचे...

अलका बियाणी उवाच ! शिक्षण पैसा मिळवण्याचे साधन नाही तर आनंदी जीवनाचे साधन आहे

केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर ‘रजत स्मरणदीप’ रौप्य महोत्सवाची सांगता ; रजतस्मृती’ माजी विद्यार्थी संमेलन संपन्न अकोला दिव्य न्यूज : दीप जसा सर्वांना प्रकाशमय करतो तशाच प्रकारे आज सहकारच्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहकार विद्या मंदिर प्रकाशमय करतो आहे. इथल्या शाळेची खूप वैशिष्ट्ये आहेत. मुलांना अभ्यास करण्यासाठी पुस्तकेच नाही तर इथलं संपूर्ण प्रांगण अभ्यासासाठी आहे. आज देशाला पुढे नेण्यासाठी, भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रत्येकाला कार्य करावे लागणार असून ‘शिक्षण पैसा मिळवण्याचे साधन नाही, तर जीवन आनंदी बनवण्याची साधन आहे’.असे विचार अलका बियाणी यांनी व्यक्त केले.

केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिरात तीन दिवस सुरू असलेल्या ‘रजत स्मरणदीप’, २५ वर्षाचा तेजोमय ज्ञानदीप रौप्य महोत्सवाची ‘रजतस्मृती माजी विद्यार्थी संमेलन’ व सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता करण्यात आली. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बियाणी बोलत होत्या. मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा अलका बियाणी, आधारस्तंभ किसनलालजी केला, डॉ. किशोर केला, माजी विद्यार्थी अजेश माळी, मुख्य संयोजिका डॉ.सौ.स्वाती केला, ओमप्रकाश गांधी, पुरूषोत्तम राठी, गोपाल टावरी, चतुर्भुज केला, प्रमोद भन्साली, सुनील भैय्या, प्राचार्य विनायक उमाळे, प्राचार्य प्रकाश भुते,प्राचार्य रवींद्र घायल, प्राचार्य राजेश लोहिया, प्राचार्य विनोद ईश्वरे होते.

दीप प्रज्वलन करताना संस्थेचे आधारस्तंभ किसनलालजी केला आणि मान्यवर

सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते गणपती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर गणपती वंदना, सरस्वती वंदना, गुरुवंदना नृत्याने वंदन करून अतिथींचे स्वागत स्वागतगीत नृत्यातून करून करण्यात आले.

विचार मंचावर डॉ.किशोर केला, प्रमुख पाहुणे कैलास तानकर, किसनलालजी केला, ओमप्रकाश गांधी, अलका बियाणी, मुख्य संयोजक डॉ. स्वाती किशोर केला व मान्यवर

गेल्या २५ वर्षात सहकार विद्या मंदिराचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात आपले नाव उज्वल करत आहेत, त्याचा अनुभव आजच्या विद्यार्थी संमेलनातून दिसत होता. २५ वर्षात आपण काय केलं व पुढील १० वर्षात काय करायचे याचे नियोजन आम्ही करतो आहे.‌आज पालकांनी विद्यार्थ्यांशी आपल्या पाल्यांची सुसंवाद करणे गरजेचे आहे असे स्वागताध्यक्ष डॉ. किशोर केला यांनी आपल्या स्वागतपर भाषणातून व्यक्त केले.

आपल्या प्रास्ताविक भाषणात डॉ.स्वाती केला यांनी तीन दिवस चाललेल्या या “रजत स्मरणदीप” २५ वर्षाचा तेजोमय ज्ञानदीप रौप्य महोत्सवाविषयी आपले विचार मांडताना आज माजी विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात काम करताना आनंद होत आहे. अशीच भरारी प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावी असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी विद्यार्थी,माजी शिक्षक,शिक्षिका यांनी आपल्या मनोगतात शाळेविषयी विचार मांडले. यामध्ये सौ.रश्मी राठी , दिपाली नवले, सोनाली चव्हाण यांनी शाळा म्हणजे आमचे माहेर. आज आम्हाला आमच्या माहेरी आल्यासारखे वाटत आहे असे आपल्या भाषणातून व्यक्त करून शाळेला रौप्य महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच माजी विद्यार्थी प्रथमेश व्यवहारे, साहिल राजनकर, अली खान, प्रगती उगले यांनी आम्हाला या शाळेने दिलेले संस्कार शिस्त ,प्रेम आम्ही आमच्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला कधी विसरू शकत नाही त्याप्रमाणे आम्ही आमच्या शाळेला कधीही विसरू शकणार नाही असे आपल्या भाषणातून व्यक्त केले व शाळेला रौप्य महोत्सवाच्या शुभेच्छा देऊन आम्ही पुन्हा शाळेच्या शतक पूर्तीसाठी एकत्र येऊ असे उद्गार काढले. रजतस्मुर्ती माजी विद्यार्थी संमेलनासाठी
अनेक माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम सपन्न झाला यामध्ये विविध नृत्य व नाटिका , शाळेच्या २५ वर्षांची तेजोमय यशोगाथा सांगणारा, शाळेच्या मुख्य संयोजिका डॉ. सौ. स्वातीताई केला लिखित पोवाडा व सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे खास आकर्षण कैलास तानकर मोटिव्हेशनल स्पीकर अँड सिंगर, बॉलीवूड आयफा अवॉर्ड विनर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विजेता कैलास मानकर व त्यांचा संच यांनी विद्यार्थ्यांना संगीतमय वातावरणात मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका वैष्णवी चतारे व ढगे या तर आभार प्रदर्शन मधुरीना चोपडे यांनी केले. यावेळी पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, बुलढाणा अर्बन बँक कर्मचारी हजर होते. राष्ट्रगीताने या ‘ रजत स्मरणदीप ‘२५ वर्षाचा तेजोमय ज्ञानदीप रौप्य महोत्सवाची सांगता करण्यात आली. उपस्थितांनी रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!