Tuesday, May 13, 2025
HomeUncategorizedअकोल्यातील हजारो विद्यार्थ्यांनी घेतला 'अक्ष करन्सीज' च्या जागतिक मुद्रा प्रदर्शनीचा

अकोल्यातील हजारो विद्यार्थ्यांनी घेतला ‘अक्ष करन्सीज’ च्या जागतिक मुद्रा प्रदर्शनीचा

अकोला दिव्य न्यूज : स्थानिक श्री.अकोला गुजराती समाज द्वारा संचालित श्रीमती महेरबानू विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आज ‘अक्ष करन्सीज’ च्या वतीने जागतिक मुद्रा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अकोला शहरातील विविध शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीस भेट देऊन पाहणी केली.

प्रदर्शनीचे उद्घाटन आज सकाळी संस्थेचे कार्यकारी सदस्य महेंद्र डेडीया यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिपेन शहा, अकोला गुजराती समाजाचे कोषाध्यक्ष कनक शहा, महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ.स्मिता शिंगरूप, महाविद्यालयाचे उपप्राचार्य  डॉ.मयूर मालविया, प्रा.राखी मलही, प्रा. अवनी कुलकर्णी, प्रा.कुदुस फारुकी यांच्यासह इतरही प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. ‘अक्ष करन्सीज’चे संचालक अक्षय खाडे यांच्यातर्फे आयोजित या प्रदर्शनीच्या आयोजनासाठी पल्लवी खाडे, आशय खाडे, साक्षी खाडे , अ.भा.लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदीप खाडे,आशिष सरोदे,अक्षय अरबट, अँड.निखिल देशमुख, श्रीकांत पागृत,आशिष गोसावी यांनी सहकार्य केले.
 आज दिवसभर चाललेल्या या प्रदर्शनीस अकोला शहरातील विविध शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकासह या प्रदर्शनीस भेट देऊन अवलोकन केले. सदर प्रदर्शनीत भारतीय नव्या, जुन्या करन्सीज सह जगातील सर्व देशांच्या चलनाचा समावेश आहे. सुमारे 1200 वर्षापूर्वीच्या नाण्यांसह मुघलकालीन, शिवकालीन व इतरही राजांच्या काळातील नाण्यांचा मोठा संग्रह आहे. एकाच छताखाली जागतिक करन्सी व नाणे बघावयास मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. जागतिक करन्सी व पुरातन नाण्यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने सदर प्रदर्शनी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट पर्वणी आहे. आज पर्यंत अक्ष करन्सीतर्फे 50 पेक्षाही जास्त प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून लाखो विद्यार्थी व नागरिकांनी या प्रदर्शनीचे अवलोकन केलेले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!