• एमएसएमई – व्यापाऱ्यांच्या विषयावर होणार मंथन
अकोला दिव्य न्यूज : ‘फाम’ अर्थात महाराष्ट्र व्यापार संघाची शिखर संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने 24 मे रोजी दुपारी 2-30 वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात अखिल भारतीय व्यापारी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात एमएसएमई व्यापारी व उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन फामचे प्रदेश उपाध्यक्ष रमाकांत खेतान यांनी केले.

फामचा स्थापना दिवस हा व्यापारी एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 47 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात एमएसएमई – व्यापारी, उद्योजक वर्गाच्या समस्या व अडीअडचणीवर चर्चा करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांचा आर्थिक विकास, व्यापारी परंपरा व प्रथांना सुगम बनविणे तसेच जमिनी स्तरावरील उद्योगांना कसे सशक्त करता येईल याचा उहापोह या अधिवेशनात करण्यात येणार आहे.
यात फामचे अध्यक्ष जितेंद्र शाह एमएसएमई- व्यापाऱ्यांना प्रभावित करणाऱ्या व्यापक नीतीचा उहापोह करणार असून यात कायदा, कर प्रणाली व व्यापारी समस्यांच्या अडीअडचणी कशा दूर होतील यावर आपले विचार व्यक्त करतील. या राष्ट्रीय व्यापारी अधिवेशनात एमएसएमई, न्यायालय, कलम 138 च्या संदर्भातील चेक अनादर, औद्योगिक भूखंड, कौशल्य क्षमता, बीआयएस परीक्षण जीएसटी कलम 16/2 (सी), जीएसटी आयएन नोंदणी रद्द करणे, जीएसटी तपास, विहीन एससीएन, अपील पूर्व निकासी, पक्षपाती निर्णय, पीएलआय योजनेत एमएसएमई आदींना सामील करणे, एफटीए उल्लंघन आदी विषयावर ठराव मांडण्यात येणार आहेत.
या परिषदेत राज्यातील सर्व संघ,फेडरेशन, चेंबर्स समवेत भारतीय संघांना आमंत्रित करण्यात आले आहे.तरी या राष्ट्रीय व्यापार परिषदेत एमएसएमई- व्यापारी, उद्योजक वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खेतान यांनी केले आहे.