Wednesday, May 7, 2025
HomeUncategorizedOperation Sindoor: बदला ! पाकमध्ये घुसून ९ ठिकाणावर हल्ला ! एअर स्ट्राईक...

Operation Sindoor: बदला ! पाकमध्ये घुसून ९ ठिकाणावर हल्ला ! एअर स्ट्राईक केलेलें लोकेशन काय ?

अकोला दिव्य न्यूज : Operation Sindoor Updates: पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं एअर स्ट्राईकनं घेतला आहे. मंगळवारी रात्री उशिरा दीड वाजता भारतानं पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं.

पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं एअर स्ट्राईकनं घेतला आहे. मंगळवारी रात्री उशिरा दीड वाजता भारतानं पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या ऑपरेशनला सिंदूर असं नाव दिलं गेलं होतं. अवघ्या २३ मिनिटांत भारतीय हवाई दलानं मोहीम फत्ते केली. भारताच्या ब्रह्मोस आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानला दणका दिला.

पहलगाम हल्ल्याचा बदला १५ दिवसांत घेण्यात आलेला आहे. भारताच्या पराक्रमी सैन्यानं पाकिस्तानातील ४ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ५ ठिकाणं उद्ध्वस्त केली. भारताची गुप्तचर यंत्रणा रॉनं सगळी ठिकाणं निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरचं नियोजन करण्यात आलं. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदची ठिकाणं लक्ष्य करण्यात आली. २०१९ मध्येही भारतीय सैन्यानं एअर स्ट्राईक केला होता. पण त्यावेळी झालेली कारवाई केवळ पाकव्याप्त काश्मीरपर्यंत मर्यादित होती. पण यंदा भारतीय सैन्यानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात कारवाई केली आहे.

भारतीय सैन्यानं जमीनदोस्त केलेले दहशतवादी तळ नेमके कुठे?
१. बहावलपूर– आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास १०० किलोमीटर दूरवर आहे. इथेच जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय होतं. हे मुख्यालय भारतीय सैन्यानं जमीनदोस्त केलं होतं.
२. मुरीदके– हा दहशतवादी तळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून ३० किमी दूर आहे. लष्कर-ए-तैयबाची शिबिरं इथे व्हायची. या तळाचा संबंध मुंबईवरील २६/११ हल्ल्याशी आहे.
३. गुलपूर– हा दहशतवादी तळ एलओसी (पुंछ-राजौरी) पासून ३५ किलोमीटर दूर आहे.
. ४. लष्कर कॅम्प सवाई– हा दहशतवादी तळ पीओके तंगधार सेक्टरच्या आतमध्ये ३० किलोमीटर दूर आहे.
५. बिलाल कॅम्प– जैश-ए-मोहम्मदचं लॉन्चपॅड, दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी या तळाचा वापर व्हायचा.
. ६. कोटली– एलओसीपासून १५ किमी दूरवर लष्कराचं शिबिर, ५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांची क्षमता असलेला तळ. ७. बर्नाला कॅम्प- हा दहशतवादी तळ एलओसीपासून १० किमी दूर ८. सरजाल कॅम्प– सांबा-कठुआच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून ८ किमी दूर असलेलं जैशचं प्रशिक्षण केंद्र. ९. मेहमूना कॅम्प (सियालकोटजवळ)- या ठिकाणी हिज्बुल मुजाहिद्दीनचं प्रशिक्षण शिबिर होतं. हा तळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५ किमी दूर होता.

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर संरक्षण मंत्रालयाकडून माध्यमांना निवेदनातून कारवाईची माहिती देण्यात आली. ‘काही वेळापूर्वी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केली. त्यात पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं, जिथून भारताविरोधात दहशतवादी हल्ल्यांची योजना तयार केली होती आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. एकूण ९ तळांना लक्ष्य करण्यात आलं. आमच्याकडून पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी इमारतीला किंवा ठिकाणाला लक्ष्य करण्यात आलेलं नाही. भारतानं लक्ष्य निवडताना संयम बाळगला,’ अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!