अकोला दिव्य न्यूज : माहेश्वरी समाजाचे वरिष्ठ कर्मठ समाजसेवी स्वर्गिय मदनलाल अजमेरा यांचे सुपुत्र आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ता तसेच अकोला जिल्हा माहेश्वरी सभेचे सदस्य आणि राजस्थान येथील आंतरराष्ट्रीय द्वारीका रणूजा रुणीचा संगम संस्थान ट्रस्ट बिकानेर या संस्थेचे महाराष्ट्रातील प्रचार प्रसार मंत्री डॉ. नवलकिशोर अजमेरा यांना राज्यस्तरीय उत्कृष्ठ प्रतिनिधि पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. जालना येथील महेश भवनात आयोजित एका कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला.

जालना येथून मागील 25 वर्षापासून अखंडपणे प्रकाशित होणाऱ्या ‘महेश मंत्र’ मासिकाच्या रजत विशेषांकाचे विमोचन अहिल्यानगर येथील रमाकांत व्यास यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमात रमाकांत व्यास यांच्या हस्ते व महेश मंत्र मासिकाचे संपादक नंदलाल राठी यांच्या अध्यक्षतेत आणि जालना येथील समाजसेवी कांतिलाल राठी, ब्रिजगोपाल तोष्णीवाल जिंतूर, डॉ.हरिप्रसाद सोनी लातुर, कैलाश लोया जालना, सत्यनारायण लाहोटी बीड, गंगाप्रसाद तोष्णीवाल नांदेड, श्रीकिसन भंसाली धाराशिव, नितीन तोतला जालना, पुरुषोत्तम डागा यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. नवलकिशोर अजमेरा यांना फेटा, हार घालून स्मृतिचिन्ह देऊन राज्यस्तरीय उत्कृष्ठ प्रतिनिधि पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
या प्रसंगी जालना आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रातील माहेश्वरी समाजाचे गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.