अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण बोर्डासोबत आज १३ मे २०२५ रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईकडून जाहीर करण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या निकालात पुणे येथील पीएम श्री केंद्रीय विद्यालय बीइजी येरवडा शाळेचा विद्यार्थी अमोघ आशिष भारती यांनी केंद्रीय शाळेत दुसरे स्थान पटकावून नेत्रदीपक यश मिळविले आहे. टक्केवारीत अमोघ भारतीचा प्रथम क्रमांक केवळ 0.6 टक्के गुणांनी हुकला. सीबीएसई निकाल पध्दतीने एकुण विषयांपैकी Best of Five मध्ये अमोघला 94.4 टक्के गुण मिळाले आहेत.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ही एक स्वायत्त संस्था असून जी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करते. सीबीएसईचा अभ्यासक्रम हा बोर्डापेक्षा अधिक चोख असल्याने निकालाची टक्केवारी कमी राहते. अशा परिक्षेत अमोघ याने मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. अमोल भारतीने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला असून आता NEET ची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासाला सुरुवात केली आहे.
पुणे येथे स्थायिक डॉ. आशिष बाबा भारती हे मुळचे अकोला येथील असून, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि समाजसेवी बाबा भारती यांचे जेष्ठ पुत्र आहेत. अमोघ हा बाबासेठ यांचा नातू आणि डॉ. आशिष यांचा जेष्ठ मुलगा आहे. लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या अमोघने नियमितपणे अभ्यास आणि सराव परीक्षा देत हे यश प्राप्त केले आहे. असे अमोघने सदर प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले. आपल्या अभ्यासात सतत प्रोत्साहन देणारे आजी सौ.विजया, आजोबा बाबा भारती, आई योगीता आणि वडील डॉ. आशिष भारती यांचा या यशात सिंहाचा वाटा असल्याचे अमोघ म्हणाला.