गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : अकोला दिव्य न्यूज : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही बुध्द पौर्णिमेच्या दिवशी भारताची शांत मात्र शक्तीशाली प्रतिमा जगासमोर मांडायची होती. म्हणून बौध्द पौर्णिमेच्या ५ दिवसा आधीच ६-७ मे २०२५ च्या रात्री ऑपरेशन सिंदूर’ सुरू करण्यात आले. मोदी यांच्या समर्थकांना आणि भक्तांना हे पचनी पडणारे नाही. ते याला योगायोग म्हणू शकतात. पण पंतप्रधान मोदी यांची एकूण कार्यशैली बघता ते अचूक टायमिंग साधून कामं करतात. हे मागील १० वर्षांत दिसून आले आहे.
मात्र यात वाईट वाटून घेण्यासारखे नाही किंवा गैर काहीच नाही. इतिहासातील चांगली कामगिरी वा उजळ बाजू लक्षात घेऊन पुढे निघालो तर कामगिरी अधिक उजवी होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंदिराजी आणि अटलजी यांनी मे महिन्यातच अणुचाचणी केली होती. तर मे महिन्यातच ‘ऑपरेशन सिंदूर’ करून पाकिस्तानला जगात नागडं करून मोदींनी बुध्द पौर्णिमेच्या दिवशी देशवासीयांना संबोधित केले.
इंदिराजींनी बुध्द पौर्णिमेला ‘ऑपरेशन स्माइलिंग बुध्दा’ केले

तारीख १८ में १९७४. ठिकाण : पोखरण राजस्थान
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच अणुचाचणी केली.ज्याला ‘ऑपरेशन स्माइलिंग बुध्दा’ असे नाव देण्यात आले. हे ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर भारतात ‘बुध्द हसला’ हा शब्द राजकारणातील मुत्सद्दीगिरीसाठी रूढ झाला होता. बुध्द पौर्णिमेमुळे या ऑपरेशनला महात्मा गौतम बुद्धांचे नांव देण्यात आले.भारताने स्वतःच्या अणुशक्तीने जगाला शांततेचा संदेश दिला होता.———————————————————-
अटलजींनी बुध्द पौर्णिमेला ‘ऑपरेशन शक्ती’ केले

तारीख ११ मे १९९८ ठिकाण पोखरण राजस्थान हा दिवसही बुध्द पौर्णिमेचा होता. तत्कालीन पंतप्रधान अटलजी यांनी ३ अणुचाचणी केल्या. १३ में रोजी लागोपाठ 2 अणुचाचण्या घेण्यात आल्या. ज्याला ‘ऑपरेशन शक्ती’ असे नाव देण्यात आले. महात्मा गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त अणुचाचण्या करून भारत हा शांतता प्रिय देश असल्याचा संदेश दिला .
———————————————————————————बुद्ध पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू करू शकले नसतील, परंतु त्यांनी त्या दिवसाचा उपयोग राष्ट्राला संबोधित करण्यासाठी केला. महात्मा बुद्धांच्या जयंतीनिमित्त त्यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिल.तथापि, युद्धबंदी असूनही भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. पाकिस्तानच्या नापाक कारवायांना अधिक तीव्रतेने प्रत्युत्तर देण्याचे निर्देश भारतीय सैनिकांना देण्यात आले आहेत.
