Thursday, May 15, 2025
HomeUncategorizedसंभाजी राजांच्या जयघोषाने दुमदुमली अकोला नगरी !हजारो युवकांचा सहभाग

संभाजी राजांच्या जयघोषाने दुमदुमली अकोला नगरी !हजारो युवकांचा सहभाग

अकोला दिव्य न्यूज : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त आज छावा संघटनेतर्फे अकोला नगरीतून विशाल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतील संभाजी राजांच्या जयघोषाने अकोला नगरी दुमदुमून गेली होती. प्रारंभी शिवाजी पार्क येथे खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर, छावा जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे, अ.भा.छावा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव मराठे, भाजपाचे शहर अध्यक्ष जयंत मसने, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, माजी महापौर विजय अग्रवाल, प्रदीप खाडे,दीपक मोरे, डॉ, श्रीराम लाहोळे, डॉ. संजय सरोदे, यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.

सायंकाळी 7 वाजता शिवाजी पार्क येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. पावसाचे जोरदार आगमन झाले तरी मिरवणुकीतील उपस्थितीवर काहीही फरक पडला नाही. मिरवणुकीत हजारो युवकांसह महिलांचीहीं उपस्थिती लक्षणीय होती. ढोल ताशांच्या गजरात निघालेली ही मिरवणूक अकोट स्टॅन्ड चौक, टिळक रोड, सिटी कोतवाली चौक, गांधी चौक, खुलेनाट्यगृह या मार्गाने फिरून स्वराज्य भावना जवळ मिरवणुकीचा समारोप झाला मिरवणुकीच्या मार्गावर अनेक ठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

विविध समाजसेवी संस्थांनी पाणी व फराळाची व्यवस्था केली होती.
यावर्षी मिरवणुकीत विविध देखाव्यांची रेलचेल होती. पातूरचा नामांकित वाघ, अकोटच्या जंगलातील अस्वलाची प्रात्यक्षिके, महिलांचे वारकरी मंडळ, लेझीम नृत्य, लाठ्या काठ्यांची प्रात्यक्षिके, मेळघाट मधील महिलांचे आदिवासी नृत्य, पोटात तलवार खुपसून घेतलेला भिल्ल, महाबली हनुमान, महाकाली, पिंपरी, आळंदा, देगाव, मानकी, तेल्हारा, सामदा दर्यापूर येथील आखाड्यांची प्रात्यक्षिके, अश्वारूढ झालेली विविध ऐतिहासिक पात्र यासह इतरही काही दृश्यांचा समावेशहोता. रथात विराजमान झालेले संभाजी महाराज मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते..

मिरवणुकीत रितेश मिर्झापुरे, ओम प्रकाश सावल, श्रावण लांडे, आशिष कापसे, शैलेश खरोटे, संतोष गोरे, योगेश गोतमारे विठ्ठलराव सरप, अरविंद कपले, मनीराम ताले, ऍड. देवाशीश काकड, पवन महल्ले, बालू बगाडे, पंकज जायले, सुरेश खुमकर गुरुजी, निवृत्ती वानखडे, अनिरुद्ध भाजीपाले, बबलू वसु, संतोष भिसे, बाळासाहेब लाहोळे, अशोक वाकोडे, गजानन फाटे, श्याम कुलट, प्रवीण बाणेरकर, महेंद्र काळे, परीक्षित बोचे, अमोल हिंगणे, शाम कोल्हे, मनोहर मांगटे पाटील, निखिल श्रीनगर, दिनकर पाटील, आशु वानखडे, डॉ. नरेंद्र सरोदे, डॉ. राम शिंदे, सुरेश गाढेपाटील, रवी साखरे, चेतन लोखंडे, अक्षय खाडे, गोपाल पाटकर, देवेंद्र मोहोकार, कैलास बागडे, सोनू गिरी, गोपाळराव गालट, गणेश पोलाखडे, गणेश पारस्कर, संदीप कुलट, भारत भडांगे, दीपक बिहाडे, गणेश इंगळे, विवेक इंगळे, विजय कुलट, रवी मालगन, अक्षय गोंडचवर, पंजाब भागवत, नितीन चिखलकर, संतोष बिहाडे, दीपक लोखंडे यांचे सह इतरही गणमान्य नागरिक सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!