अकोला दिव्य न्यूज : सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या दहावीचा निकालात प्रभातच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवून घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये श्रावणी महल्ले व जान्हवी देशमुख यांनी 97.80 टक्के गुण मिळवून अव्वल ठरल्या आहेत तर 115 विद्यार्थ्यांनी 85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून यश प्राप्त केले आहे.

16 विद्यार्थ्यांनी विविध विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून त्या विषयात सीबीएसई बोर्डातून मेरीट ठरले आहेत. सामाजिक शास्त्र विषयात 90 आणि 90 पेक्षा जास्त गुण 70 विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत. गणित या विषयातुन 2 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळविले तर 3 विद्यार्थ्यांनी 99 गुण आणि 33 विद्यार्थ्यांनी 90 व त्यापेक्षा जास्त गुण मिळविले. मराठी विषयामध्ये 5 विद्यार्थी हे पैकीच्या पैकी गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. तर 7 विद्यार्थी 99 गुण आणि 33 विद्यार्थी 90 च्या वर गुणांनी पास झाले.
- इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी या विषयामध्ये 9 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळविले. तसेच 9 विद्यार्थी हे 99 गुणांनी आणि 135 विद्यार्थी 90 आणि त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले. विज्ञान विषयामध्ये सुद्धा 33 विद्यार्थी हे 90 आणि त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी गुणवंतांचे प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी, समन्वयक मो. आसिफ यांनी अभिनंदन केले.