बारावीमध्ये शाळेतून नॅन्सी मिश्रा ही मुलींमधून पहिली तर आयुष रामटेके हा मुलांमधून पहिला
अकोला दिव्य न्यूज : श्री समर्थ क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाला नुकतेच २५ वर्षे पूर्ण झाले असून या रौप्यमहोत्सवी वर्षातही दहावी आणि बारावीच्या शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा राखत श्री समर्थ पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. सीबीएसई मान्यता प्राप्त श्री समर्थ पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, रिधोरानेही दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा राखत आपल्या घवघवीत यशाने गुणवत्तेची मोहर उमटवलेली आहे.

बहुप्रतिक्षित इयत्ता दहावी आणि बारावीचा केंद्रिय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलेल्या निकालात गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही श्री समर्थ पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, रिधोरा शाळेच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही उत्तम असून सर्वच विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे.समर्थच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी शाळेच्या लौकिकात भर टाकली असून शाळेच्या निकालाची टक्केवारी शतप्रतिशत असल्याने श्री.समर्थ पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय,अकोलाच्या शैक्षणिक क्षेत्राचा दर्जा अधोरेखीत करणारे ठरले आहे.समर्थ पब्लिक स्कूल ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असते.यावर्षीचा दहावी आणि बारावीच्या उत्कृष्ठ निकालाने ही परंपरा अबाधित ठेवली आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता बारावीतून नॅन्सी मिश्रा,आयुष रामटेके हे विद्यार्थी अनुक्रमे गुणवंत ठरले असून दहावीमध्ये समीक्षा खोडके, यश सुकळकर, वरद गीते,रोहित कुटे, सांची खंडेराव, तनिष्क राजूरकर, पल्लवी सोळंके, पायल धारपवार, नंदिनी सोनटक्के, पुष्कर अग्रवाल या विद्यार्थ्यांनी यशस्वी झेप घेत शाळेचे व महाविद्यालयाचे नाव उंचावले आहे.
श्री.समर्थ शिक्षण व क्रीडा प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.नितीन बाठे, कोषाध्यक्ष प्रा.जयश्री बाठे, संचालक प्रा.राजेश बाठे, प्रा.किशोर कोरपे, प्रा.योगेश जोशी, प्रा.किशोर रत्नपारखी, एज्युकेशन डायरेक्टर डाॅ.जी.सी.राव, प्राचार्य डॉ.उषालता वानखेडे, प्राचार्य सुवर्णा गुप्ता, उपप्राचार्य प्रेमेन्द्र पळसपगार यांच्यासह सर्व शिक्षकवृदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.