Sunday, May 18, 2025
HomeUncategorizedट्रम्पनी 'सिंदूर' चा गेम केला?व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर...

ट्रम्पनी ‘सिंदूर’ चा गेम केला?व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक

अकोला दिव्य न्यूज : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने २ जिहादींना व्हाईट हाऊसच्या धार्मिक स्वतंत्रता आयोगाच्या सल्लागार बोर्डावर नियुक्त केले आहे. इस्माइल रॉयर आणि शेख हमजा अशी त्यांची नावे आहेत. याचा खुलासा पत्रकार लॉरा लूमरने एक्सवर केला आहे. रॉयर दहशतवादाशी संबंधित आरोपात १३ वर्ष जेलमध्ये होता. रॉयरवर दहशतवादी कृत्यात सहभागी होण्याचा आरोप आहे. ज्यात अमेरिकेविरोधात युद्धाचा कट रचणे आणि २००३ साली अल कायदा-लश्कर ए तोयबा यांना मदत करण्याचा आरोप होता.

वॉशिंग्टन पोस्टनुसार, २००४ मध्ये रॉयरने शस्त्रे आणि स्फोटकांचा गैरवापर करणे, दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप स्वीकारला होता. त्याला २० वर्ष शिक्षा सुनावली, त्यातील १३ वर्ष त्याला जेलमध्ये राहावे लागले. व्हाईट हाऊसने रॉयरला त्यांच्या सल्लागार कमिटीत समाविष्ट करत त्याच्याबाबत लिहिलंय की, त्याने पारंपारिक इस्लामी विद्वानासोबत मिळून धार्मिक विज्ञानचा अभ्यास केला आहे. विनालाभ इस्लामी संघटनांमध्ये त्याने एक दशकाहून अधिक काळ काम केले होते. १९९२ साली त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता.

लेखन अनेक ठिकाणी प्रकाशित झालीत, त्यात इस्लामवर आधारित लेख रिलीजियस वायलेंस टुडे फेथ एँन्ड कॉन्फिक्ट इन मॉर्डनचे लेखन केले होते. २०२३ साली मिडिल ईस्ट फोरमसोबत चर्चेत रॉयरने त्याच्या प्रवासाचा उल्लेख करत कसे जिहादी बनला ते सांगितले होते. त्याने लश्कर ए तोयबाच्या संबंधाबाबत खुलासा केला. तो म्हणाला होता की, मला लश्कर ए तोयबाचे लोक आवडत होते. मी बिन लादेनचा विरोधी होतो. अल कायदा एक विखुरलेला समुह होता. मी मस्जिदीत मुसलमानांना लश्कर ए संघटनेत सहभागी होण्यासाठी आणि काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करत होतो असं त्याने सांगितले.

इस्माइल रॉयर कोण आहे ? रॉयर एक फोटोग्राफर आणि शिक्षकाचा मुलगा आहे. सेंट लुईस येथे त्याचे पालन पोषण झाले. लहान वयातच तो कट्टरपंथीच्या दिशेने आकर्षिक झाला. १९९२ साली इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर रॉयरने त्याचे नाव इस्माइल ठेवले. वॉशिंग्टन डीसीमध्ये कौन्सिल ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेंशससोबत काम केल्यानंतर तो देशातील गृहयुद्ध लढण्यासाठी बोस्नियाला गेला. बोस्नियातील युद्ध संपल्यानंतर रॉयर अमेरिकेला परतला. २००० साली तो पुन्हा परदेशात गेला, यावेळी तो पाकिस्तानातील लश्कर ए तोयबात भेटीला गेला होता.

शेख हमजा युसूफचं टेरर बॅकग्राऊंड : शेख हमजा युसूफ कॅलिफोर्नियातील जैतुना कॉलेजमध्ये सहसंस्थापक होता. इस्लामी दहशतवादाशी तो जोडलेला आहे. शेख हमजा युसूफ मुस्लीम ब्रदरहूडशी लिंक आहे. ९/११ हल्ल्याच्या दोन दिवस आधी युसूफने जमील अल अमीनच्या इव्हेंटमध्ये भाषण केले होते. जमीन अल अमीनवर एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा खटला सुरू होता. युसूफने अमेरिकेवर वर्णभेदाचा आरोप केला होता. अमेरिकेवरील हल्ल्यात त्याची चौकशीही केली होती. दहशतवादी पार्श्वभूमी असूनही शेख हमजा युसूफला ट्रम्प प्रशासनाने व्हाईट हाऊस एडवाइजरी बोर्डात सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!