अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत, पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान पूजा मेश्राम हिने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.

ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती, ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील महिलांनी सहभाग घेतला होता. जागतिक स्तरावरील अशा स्पर्धेत पूजाने आपल्या आत्मविश्वास व प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या. उपविजेतेपदाबरोबर, त्यांना सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल “सोशल मीडिया क्वीन” आणि त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल “मिसेस करेजियस” असे दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले:

पूजाचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. अवघ्या १८व्या वर्षी त्यांनी मिसेस अकोला हा मुकुट पटकावला आणि त्यानंतर मिस महाराष्ट्र, मिसेस इंडिया इंटरनॅशनल, आणि टॉप मॉडेल २०१८ सारख्या अनेक किताबांवर आपलं नाव कोरलं. त्यांच्या यशस्वी वाटचालीत सातत्य, आत्मविश्वास आणि स्वप्नांना सत्यात उतरवण्याची चिकाटी दिसून येते. या आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांनी सिंगापूरचे प्रतिनिधित्व करताना आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अकोल्याच्या अभिमानाचा ठसा उमठवला.
या अनुभवाबद्दल बोलताना पूजा म्हणाल्या : ही केवळ माझी वैयक्तिक विजय नाही तर ती प्रत्येक मुलीची विजय आहे जी मोठी स्वप्न पाहते, मग ती कुठल्याही कोपऱ्यातून का येऊ नये. अकोल्याच्या मातीत वाढलेली मी,आज जागतिक व्यासपीठावर उभी आहे. हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे.
पेजेंट व्यतिरिक्त, पूजा या एक प्रोफेशनल वॉटरकलर आणि कॉफी पेंटिंग कलाकार आहेत. त्यांच्या चित्रांमध्ये नजाकत आणि भावनांची खोली यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. पूजाची कहाणी म्हणजे धैर्य, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यांचं मूर्त स्वरूप आहे. ही केवळ तिचीच नाही, तर प्रत्येक अकोल्याच्या माणसाची विजयगाथा आहे, ज्यांनी कधी ना कधी स्वप्नं पाहिलेली असतात.
