अकोला दिव्य न्यूज : माहेश्वरी समाजाचे आराध्य भगवान महेश यांच्या महेश नवमी पर्वात ग्रामीण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अकोला जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने महेश पर्वा निमित्त ग्रामीण परिसरात महेश नवमीचा उत्सव द्विगूणित करण्यासाठी दौरे आखून समाजबांधवांशी सुसंवाद करणे प्रारंभ केले आहे.

सभेचे प्रदेश संगठन मंत्री नरेश बियाणी व महासभेचे प्रा.डॉ. रमण हेडा यांच्या मार्गदर्शनात तथा जिल्हा महासभेचे अध्यक्ष रवींद्र भन्साली, महेश नवमीचे जिल्हा संयोजक संदीप बुब यांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष राजेश राठी यांच्या समवेत या दौऱ्याचा प्रारंभ बोरगावमंजू येथून करण्यात आला.
येथील समाजसेवी कमल चांडक, डॉ शामसुंदर डागासह समाज बांधवांच्या भेटीनंतर पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण तहसील सचिव गणेशलाल हेडा सोबत काटेपूर्णा येथे उपस्थित होऊन काटेपूर्णाचे माजी सरपंच डॉ राधेश्याम मालाणी व गावातील अन्य समाज बांधवांशी संपर्क साधून आगामी ४ जून रोजीच्या महेश नवमी उत्सवाची माहिती दिली. यानंतर पदाधिकाऱ्यांनी मुर्तीजापुर येथे भेट देऊन तहसीलचे अध्यक्ष श्यामसुंदर सोमाणी, सचिव कैलास साबू, देविदास बांगड, हार्दिक बुब, आनंद बांगड व कुरुमचे राहुल राठी यांच्याशी संवाद साधत आगळे वेगळे उपक्रम राबवून महेश नवमी उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले.

यावेळी जिल्हा प्रचार मंत्री राजेश सोमाणी यांनी उत्सवाची माहिती दिली. या समाजबांधव संपर्क अभियानाच्या द्वितीय टप्प्यात पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शेवटचे गाव असणारे दानापूर येथे भेट देऊन समाज बांधवांची संपर्क साधला. यावेळी गावातील प्रदेश सदस्य मनमोहन राठी, महेश गांधी, नवल गांधी, अशोक गांधी, रमण चांडक, राजेंद्र राठी, सतीश राठी, दीपक राठी, संतोष राठी आदी समाज बांधवांशी उत्सव व सामाजिक विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली. दरम्यान बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधी गणेश गांधी यांनी ही मार्गदर्शन केले. यावेळी गावातील कुटुंबप्रमुख 95 वर्षीय शृंगारीदेवी नेमीचंद राठी यांचा आशीर्वाद घेऊन पदाधिकाऱ्यांनी तेल्हारा कडे कुच केले.

तेल्हारा येथे महासभेचे प्रतिनिधी अशोक राठी, प्रदेश सदस्य विनोद भुतडा, तहसील सचिव सतीश बागानी, रवी चांडक, राजू राठी, विक्की मल्ल यांनी वेळी पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी तहसील मधील महेश नवमीच्या कार्यक्रमांची रूपरेखा मांडण्यात आली. दरम्यान आमदार प्रकाश भारसाकडे यांनी आपली उपस्थिती दर्शवीत, समाज बांधवांना आगामी महेश नवमी पर्वाच्या शुभेच्छा देत पदाधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या हस्ते, वाडी आदमपूरचे सरपंच रुपेश राठी यांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर पदाधिकाऱ्यांनी अकोट येथील सेंट पॉल पब्लिक स्कूल येथे तहसील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सहभागी होऊन समाज बांधवांशी सुसंवाद साधला. या प्रसंगी महासभेचे प्रतिनिधी नवनीत लखोटिया, प्रदेश प्रतिनिधी प्रमोद चांडक, ओमप्रकाश हेडा, तहसील अध्यक्ष सुनील सोमानी, स्थानिक अध्यक्ष सुरेश टावरी, गौरव झंवर, संदीप चांडक, निखिल टावरी, नितेश राठी, किशोर लखोटिया आदींनी अकोट तहसील व ग्रामीण भागात ४ जूनला होणाऱ्या महेश नवमी उत्सवाची माहिती दिली. यावेळी बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.