Friday, June 13, 2025
HomeUncategorizedसन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अकोला दिव्य न्यूज : सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालामध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत आणि प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या प्राचार्या मनीषा राजपूत उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची अधिष्ठात्री माता सरस्वतीच्या पूजनाने झाली.

याप्रसंगी इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी आणि पालक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने हजर होते. याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या मनीषा राजपूत यांनी इयत्ता दहावीच्या निकालाचे विश्लेषण केले. मार्च 2025 मध्ये इयत्ता दहावीच्या चाळीस विद्यार्थ्यांमधून प्राविण्य प्राप्त सव्वीस विद्यार्थी, बारा विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर दोन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. सलग ७ वर्षा पासून १००% निकालाची परंपरा कायम आहेच परंतु गेल्या कित्येक वर्षापासून असलेले प्राचार्या मनीषा राजपूत यांचे स्वप्न शंभर पैकी शंभर टक्के गुण घेऊन संस्कृती भटकर हिने पूर्ण केले.

शाळेच्या इतिहासात प्रथमच शंभर टक्के गुण मिळवण्याचा मान मिळवला असे सांगितले.यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यश हे एका दिवसात प्राप्त होत नसून त्यामागे इयत्ता नर्सरी पासून ते इयत्ता दहावी पर्यंतच्या शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रयत्न असतात असे सांगितले.त्यानंतर प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये संस्कृती भटकर 100 टक्के किशन कसबेकर 95, ईशा लासुरकर 95, अंशुमन कोंडे 94.80, स्वराज वानखडे 94.40, प्रणव ढेंगळे 93.40,अंश धवणे 92.60 , गौरव सोळंके 92.40, तृप्ती अघडते 89.40 ,सोहम देशमुख 89, सुजल पवार 87.20 ,मनाली काळे 84.60 ,गौरव दवंडे 84.40, दिशिन मस्करे 83.20 ,सायली मुरूमकर 82.69 , अभिजीत डोंगरे 80.80 , प्रनौती प्रधान 79, प्रथमेश तायडे 78.40 ,रोहित अहिर 77.60, गणेश सांगळे 77.20, सिद्धांत पाटील 76.80 , कावीश खान 76.40, राम हातोलकर 76,समृद्धी उगले 75.80 , श्रुती धांडे 75.20 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष राजपूत यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे खानझोडे, चित्रा देशपांडे, रक्षा पांडे, दुर्गा राऊत, पंकज गाढे आणि श्याम जवंजाळ या शिक्षकांचा, तसेच शिक्षकेतर कर्मचारी व प्राचार्या राजपूत यांचा बक्षीस देऊन सत्कार केला. याप्रसंगी प्रणव ढेंगळे, संस्कृती भटकर,ईशा लासुरकर, किशन कसबेकर या विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देताना शिक्षकांचे भरभरून कौतुक करुन आभार मानले. ढेंगळे, कसबेकर, भटकर या पालकांनी आपले विचार व्यक्त केले आणि प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष राजपूत यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा पालक,शिक्षक व विद्यार्थी यांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिपाक असतो असे सांगितले. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि सातत्य गुण तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेऊ शकतात असे सांगितले. कौतुक सोहळा फक्त विद्यार्थ्यांचा नसून त्यांच्या आई-बाबांचा व सर्व शिक्षकांचा आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खानझोडे तर आभार प्रदर्शन दुर्गा राऊत यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!