Sunday, June 15, 2025
HomeUncategorizedमध्यरात्रीचा थरार ! आ.संजय कुटेंच्या घरात शेतकरी पेट्रोलची कॅन घेऊन शिरला...….

मध्यरात्रीचा थरार ! आ.संजय कुटेंच्या घरात शेतकरी पेट्रोलची कॅन घेऊन शिरला…….

अकोला दिव्य न्यूज : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता प्रहारचे बच्चू कडू लढत असताना उपोषण करत असताना दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार संजय कुटे यांच्या घरात एका शेतकऱ्याने रात्री थेट पेट्रोलची कॅन घेत हल्ला चढविल्याने मोठा अनर्थ होता होता टळला. यावर्षी मे महिन्यातच पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर शेतकरी खरीप हंगामाची तयारी करत असताना त्रस्त झाला आहे संपूर्ण जमीन तयार केल्यानंतर ती निसरडी झाल्यामुळे आता जगाचा तरी कसं या विवंचनेत तो आहे आणि त्यामुळे हे असे उपद्रवी पावले आता उचलल्या जात आहे.

अतिवृष्टीमुळेशेतीच झालेल्या नुकसानीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचा आ. संजय कुटे यांचं निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न होता. मात्र वेळेवरच प्रसावधान राखल्यामुळे ही मोठी घटना टळली. काल मध्यरात्री आमदार संजय कुटे हे त्यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी हजर असताना संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुड याने संजय कुटे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात प्रवेश मिळवला.

हातात पेट्रोलचे कॅन घेऊन मला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला अद्याप न मिळाल्याने मी आमदारांचा बंगला जाळून टाकतो असं म्हणत पेट्रोलचे कॅन घेऊन बंगल्याच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना कुटे यांच्या स्विय सहायक यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. या प्रकरणी पोलिसांनी शेतकरी विशाल मुरुख यांच्या विरुद्ध BNS 333 , 351(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस करत आहेत.
संजय कुटे भाजपचे संकट मोचक..!
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदार संघाचे माजी मंत्री म्हणून आणि भाजपचे संकट मोचक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. 2004 पासून ते सलग विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येतात. यापूर्वी त्यांनी भाजपच्या मंत्रिमंडळात मंत्रि म्हणून देखील कामकाज पाहिला आहे. या सर्व घटनेमुळे जिल्ह्यात राज्यात एकच खळबळ उडाली आहे एकीकडे अमरावती येथील बच्चू कडू यांचे आंदोलन तर नुकतेच पुण्यात अजित पवार यांच्या कार्यक्रमात प्रहार कार्यकर्त्यांनी केलेला राडा यामुळे आता सरकारच्या समोर एक मोठे आवाहन उभे राहत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!