अकोला दिव्य न्यूज : Akola Accident News : पातूरजवळ ऑटो आणि ट्रकमध्ये धडक होऊन भीषण अपघात घटना घडली असून या अपघातात दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर इतर 4 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती हाती आली आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर बाळापूर रस्त्यावरील बाभूळगावजवळ हा अपघात झाला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, ट्रकने ऑटोला जबर धडक दिल्याने दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ऑटो रिक्षामधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळावरुन ट्रक चालक फरार झाला असून बाळापूर पोलीस त्याचा शोध घेत अधिक तपास करीत आहे. ट्रकची धडक इतकी भीषण होती की ऑटो पलटी होऊन प्रवासी रस्त्यावर फेकल्या गेलेत.
या भीषण अपघातात दोघांना आपला जीव गमावावा लागलाय. गंभीर जखमींना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं गेल आहे. ऑटोमधील प्रवासी व अकोला येथील सिंधी कॅम्पचे रहिवासी पियुष रविंद्र चतरकर (वय 13) आणि लाखनवाडा येथील रहिवासी लिलाबाई ढोरे (वय 50) असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींची नावे. सुरेंद्र चतरकर (वय 45), रविंद्र चतरकर (वय 52), रूपंचंद वाकोडे (वय 50), प्रमिलाबाई वाकोडे (वय 65) हे गंभीर जखमी झाले.