अकोला दिव्य न्यूज : सध्या सोशल मीडियावर अनेक अॅप आले आहेत, त्यातील काही ऍप दैनंदिन कामासाठी उपयोगी ठरतात. तर काही ऍप घातक ठरत आहेत. अशाच एका ‘समलिंगी डेटिंग अॅप’द्वारे फसवणूक केल्याचा प्रकार अकोला शहरात समोर आला आहे. या प्रकारच्या फसवणूकीने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून, दोघांना अटक केली आहे.

विविध मार्गांनी लोकांची आर्थिक फसवणुक करण्याचे प्रमाण वाढले असून एका बँकेच्या अधिकार्याचा समलिंगी संबंधांचा अश्लील व्हिडिओ काढून फसवणूक केल्याची घटना अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. पोलिसात फसवणुकीची तक्रार झाल्यानंतर या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. फसवणुक झालेल्या या अधिकाऱ्याची एका ऍपच्या माध्यमातून दोघांसोबत ओळख झाली.या ऍपच्या माध्यमातून त्या दोघांची व्हाट्सऍपवर चॅटिंग ही सुरु झाली.
या दरम्यान एकेदिवशी या दोघांनीही खदान पोलीस स्टेशन हिंगणा रोडवरील अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या काठावर या अधिकार्याला बोलावले आणि त्या ठिकाणी या अधिकाऱ्याला समलिंगी संभोगासाठी उत्तेजित करणारे इंजेक्शन दिले. तर काही इंजेक्शन आरोपीने स्वतःला लावून घेतले असल्याची माहिती आहे.
यावेळी या दोन आरोपींनी आणखी काही साथीदाराला त्या ठिकाणी यांनी बोलावून घेतले आणि बँकेच्या त्या अधिकाऱ्यांसोबत या दोघांनी समलिंगी संभोग करतानाचे व्हिडिओ गुपचूप काढून घेतले आणि हाच व्हिडिओ या बँकेच्या अधिकाऱ्याला घातक ठरला.त्या दोन्ही आरोपींनी व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीने बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत 80 हजार रुपयाची फसवणूक केली. याबाबत आता बँकेच्या अधिकाऱ्यांनी खदान पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून खदान पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, या ॲपच्या माध्यमातून सोशल मीडियावर गैरवापर करून अनेकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं, असेही आवाहन खदान पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी नागरिकांना केले आहे