अकोला दिव्य न्यूज : आधुनिक सर्जनशील कारकीर्द घडवणारी कशिश ही अकोला शहरातील पहिली मुलगी ठरली असून भंडारी कुटुंबासह अकोल्यासाठी हा अभिमानाचा क्षण होय. अकोला शहरातील २५ वर्षीय कशिश प्रकाश भंडारी हिने अमेरिकेतील अटलांटा येथील सवाना कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईनमधून व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये प्रतिष्ठित मास्टर ऑफ फाइन आर्ट्स पदवी मिळवली आहे.

आज वेगाने वाढणाऱ्या डिजिटल युगात चित्रपट, जाहिरात आणि डिजिटल कंटेंट निर्मितीमध्ये कुशल व्यावसायिकांची मागणी वाढत आहे.काळाची चाहूल लागताच कशिशने हे भविष्यकालीन क्षेत्र उत्कृष्टतेने स्वीकारले. पनवेल येथील अॅमिटी युनिव्हर्सिटीमधून तिने अॅनिमेशनमध्ये बी.एससी. पूर्ण केले.
प्रसिद्ध जाहिरात व्यावसायिक प्रकाश भंडारी यांची कशिश ही सर्वात धाकटी मुलगी आहे. त्यांना चार मुली आहेत आणि मुलगा नाही, तरीही त्यांच्या सर्व मुलींनी अपवादात्मक कारकीर्द साध्य केली आहे. मोठी मुलगी पायल अमेरिकेत पॅथॉलॉजिस्ट आहे. पिनल अभियंता आहे. सुरभी होमिओपॅथीमध्ये एमडी आहे आणि कशिश आता व्हीएफएक्स कलाकार आहे. त्यांची आई विजया भंडारी यांनी त्यांचे पालनपोषण व शिक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. कशिशची कामगिरी आधुनिक महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून शहरात साजरी केली जात आहे.
अकोला दिव्य परिवारातील जेष्ठ सदस्य प्रकाश भंडारी यांचे मनस्वी अभिनंदन आणि कोशिश हिला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा